ईडीने सील केलेल्या DSK यांच्या बंगल्यात सात लाखांची चोरी

डीएसके

पुणे : बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी (DSK) यांच्या ईडीने सील केलेल्या बंगल्यात एकूण ७ लाखांची चोरी झाली आहे. याप्रकरणी भाग्यश्री कुलकर्णी यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. फसवणुकीच्या गुन्ह्यात डीएसके हे मागील चार वर्षांपासून तुरुंगात आहेत.

बांधकांम व्यावसायिक दीपक कुलकर्णी उर्फ डीएसके यांनी ग्राहकांना विविध आकर्षक ऑफर देऊन आपल्या कंपनीत गुंतवणूक करण्यास भाग पाडले. मात्र या ठेवी त्यांनी परत न देता अनेकांची फसवणूक केली होती. २०१४ साली हे प्रकरण उघडकीस आले होते.

त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर दीपक कुलकर्णी उर्फ डीएसके यांच्या डीएसके बदर्स अॅण्ड कंपनीला या ठेवी परत करण्यासाठी काही मुदत देण्यात आली मात्र या कंपनीने मुदतीत ही भरपाई केली नाही. त्यानंतर डीएसके यांना न्यायालयाने शिक्षा ठोठावली होती. त्यांची सर्व मालमत्ताही जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने यावेळी दिले होते.

ईडीने जप्त केलेल्या बंगल्यातच चोरी झाल्याने हा चर्चेचा मुद्दा बनला आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु आहे असे पोलिसांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या