उत्तरप्रदेशातून विमानाने येऊन पिंपरी- चिंचवडमध्ये घरफोड्या करणाऱ्या चोराला अटक

पुणे : उत्तरप्रदेशातून विमानाने येऊन पिंपरी- चिंचवड परिसरात घरफोड्या करणाऱ्या चोराला पोलिसांनी काल अटक केली आहे. हा चोर उत्तरप्रदेशातील जौनपूरचा रहिवासी आहे. चोरी करण्यासाठी तो विमानाने पुण्यात येऊन आलिशान हॉटेलमध्ये दोन तीन दिवस रहात असे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

वाकड परिसरात झालेल्या घरफोड्यानंतर पोलिसांनी तिथल्या सीसीटीव्हीच्या चित्रीकरणाच्या आधारे तपास केला असता एका हॉटेल कर्मचाऱ्याकडून या आरोपीबद्दल ही माहिती उघडकीस आली होती. त्याच्याकडून सोन्याचे दागिने, लॅपटॉप असा एकंदर आठ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

आरोपीकडून २५ तोळे सोन्याचे दागिने आणि लॅपटॉप असा आठ लाखांचा ऐवज जप्त केला. वाकड पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल मिश्री राजमर (वय ३६, रा. बोदरी, जि. जोनपूर, उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

आरोपी अनिल सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी मुंबईमधील वाळीव पोलिस ठाण्यात तीन आणि पुणे येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात एक असे एकूण चार घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.

महत्वाच्या बातम्या