राज्यातील थिएटर, नाट्यगृहे होणार खुली; कशी असेल नियमावली??

चित्रपट

मुंबई : राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गर्दीच्या सर्व ठिकाणांवर जाणं बंधनकारक करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला होता. कोरोनाच्या दोन्ही लाटांमध्ये अनेकांना जीव गमवावा लागला. या काळात सर्वसामान्य नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. राज्यातील शाळा, महाविद्यालये, प्रार्थनास्थळे, सिनेमागृह, नाट्यगृह हे सर्वच ठिकाणे बंद होती. मात्र कोरोनाची संख्या आता आटोक्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील चित्रपटगृह, नाट्यगृह सुरू करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने २५ सप्टेंबर दिवशीच्या बैठकीत घेतला. येत्या २२ ऑक्टोबरपासून चित्रपटगृह, नाट्यगृह सुरू करण्यात येणार आहेत. त्याकरीता खबदारी म्हणून  पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाकडून नियमावली जाहीर करण्यात आले आहे.

मात्र कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता यासाठी नियमांची चौकट घालून देण्यात आली असून नियमांचे पालन न करणाऱ्यांविराधोत नियमानुसार कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. केंटन्मेंट झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणीच चित्रपटगृह आणि नाट्यगृहांना परवानगी देण्यात आली आहे.

असे असणार नियम- 

  •  सभागृहात प्रवेश देताना थर्मल टेस्टद्वारे प्रेक्षकांच्या शारीरिक तापमानाची चाचणी घेऊनच प्रवेश देणे.
  • सर्वांनी मास्क लावणे आवश्यक राहील
  • बंदिस्त सभागृहाच्या एकूण बैठक क्षमतेच्या 50 टक्के इतक्या मर्यादेपेक्षा प्रेक्षक संख्या जास्त असू नये.
  •  बंदिस्त सभागृहातील व्यासपीठ व प्रेक्षकांमध्ये शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार सामाजिक अंतर राखणे.
  •  बैठक व्यवस्थेत सामाजिक अंतर राखणे आवश्यक राहील.
  • बंदिस्त सभागृहातील सादरकर्त्या कलाकारांनी वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक राहिल.
  • आरोग्य सेतू अॅप इन्स्टॉल करुन ते दिवसभर सुरु ठेवावयाचे आहे.
  • सर्व कर्मचारी वर्गाचे संपूर्ण कोव्हिड प्रतिबंधक लसीकरण झालेले असणे आवश्यक असेल.
  • सभागृहातील सर्व परिसर वेळोवेळी निर्जंतुकीकरण करण्यात यावे.