fbpx

विद्यार्थिनीसोबत अश्लिल चॅटिंग करणाऱ्या शिक्षकाला तरुणांनी फासले काळे

aurangabad teacher harassment

औरंगाबाद: १२ वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीसोबत अश्लिल चॅटिंग करणाऱ्या शिक्षकाला तरुणांनी काळे फसल्याची घटना सोमवारी सकाळी शहरातील सरस्वती भुवन महाविद्यालयात घडली. पोलिसांनी आरोपी शिक्षकाला ताब्यात घेतले असून तरुणीच्या तक्रारी वरून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मनोज जैस्वाल असे आरोपी शिक्षकांचे नाव आहे.

महाविद्यालयातील  वाणिज्य शाखेत १२ वीत शिक्षण घेणाऱ्या तरुणीला शिक्षक  मनोज जैस्वाल हे मागील अनेक दिवसांपासून  व्हिडिओ कॉल व अश्लील मेसेज टाकत होता ही बाब तरुणीच्या भावाला माहिती होताच  त्याने ८ ते १० तरुणांसह  स्टाफ रूम मध्ये बसलेल्या जैस्वाल यांच्या तोंडाला काळे फासले. ही महिती मिळताच पोलिसांनी महाविद्यालय गाठत आरोपीस ताब्यात घेतले आहे . तरुणीच्या फिर्यादीवरून क्रांति चौक पोलिस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.