दुचाकी बाजूला घेण्यावरुन टोळक्याची तरुणाला मारहाण

औरंंगाबाद : घरासमोरील दुचाकी बाजूला घ्या असे म्हटल्यावरुन वाद होऊन पाच जणांनी तरुणाला मारहाण केली. ही घटना १० सप्टेंबर रोजी सायंकाळी आठच्या सुमारास मुकुंदवाडीतील मुकुंदनगरात घडली.

धम्मपाल झुंबडे हा दुचाकीने पाण्याचे जार घेऊन जात होता. तेव्हा शामराव चव्हाण याच्या घरासमोर दुचाकी उभी होती. ही दुचाकी बाजूला घ्या म्हणून झुंबडे सांगत असताना शामराव चव्हाणचा मुलगा अनिल याने आमच्या घरासमोर मुरुम टाकलेला आहे. तेव्हा तू कोठूनही जा असे म्हणाला.

त्यावर अनिलला समजावून सांगत असताना चव्हाण बाप-लेकांसह योगेश राठोड, रंजना चव्हाण आणि अंजना चव्हाण अशा पाच जणांनी झुंबडे याला शिवीगाळ व मारहाण केली. तसेच डोक्यात टिकाव मारुन जखमी केले. त्यावरुन मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या :