महाराष्ट्रातील युवकांना गोव्यात काम मिळणार नाही, गोवा सरकारचा निर्णय

पणजी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे मांडत असलेल्या स्थानिक युवकांना रोजगाराची भूमिका इतर राज्याकडून अमलात आणली जात असल्याच दिसत आहे. नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना प्राध्यान्य देण्याचा मध्यप्रदेश सरकारच्या निर्णयानंतर आता गोवा सरकारने देखील परप्रांतीयांना नौकरी देणार नसल्याच जाहीर केल आहे. विशेष म्हणजे यामध्ये गोवा भाजप सरकारने परप्रांतीयांच्या यादीत महाराष्ट्रातील लोकांनाच अग्रस्थानी ठेवले आहे. गोव्यात स्थलांतरित कामगारांना विशेषतः महाराष्ट्रातून येणाऱया लोकांना नोकऱया दिल्या जाणार नाहीत, असे पत्रकार परिषद घेऊन पर्यटन मंत्र्यांनी स्पष्ट केल आहे.

गोव्यामध्ये देशविदेशातील पर्यटकांची रेलचेल असल्याने येथे रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र परप्रांतीयांमुळे स्थानिकांना रोजगार उपलब्द होत नसल्याची ओरड कायम केली जाते. यावर उपाय म्हणून आता गोव्यात स्थलांतरित कामगारांना विशेषतः महाराष्ट्रातून येणाऱया लोकांना नोकऱया दिल्या जाणार नाहीत, असा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे.

दरम्यान, पर्यटन मंत्री आजगावकर यांनी सरकारच्या निर्णयाची माहिती देताना महाराष्ट्रातील लोकांसाठी ‘घाटी’ हा शब्दप्रयोगही केला. या शब्दाचा वापर बदनामीकारक आहे, असे त्यांच्या निदर्शनास आणून दिले असता ते म्हणाले की, घाटी शब्दात वाईट असे काही नाही. घाटावर जे लोक राहतात, ते घाटी असाच त्याचा अर्थ आहे.Loading…
Loading...