fbpx

मोटारीच्या आमिषाने चिपळूणच्या तरुणाला साडेसात हजाराला गंडा

sexual harassment by teacher in paithan

रत्नागिरी : मोबाइलवर १२ लाख ६० हजार रुपयांची अलिशान गाडी बक्षीस लागल्याचे सांगून चिपळूण येथील एका तरुणाला साडेसात हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. हा तरुण सायंकाळी तक्रार देण्यासाठी चिपळूण पोलीस ठाण्यात दाखल झाला होता.
चिपळूणच्या बहादूरशेख नाका परिसरातील अविनाश दत्ताराम माने या तरुणाला अज्ञाताकडून मोबाइलवर फोन आला. आपल्याला १२ लाख ६० हजार रुपयांची आलिशान गाडी लागली आहे. त्यासाठी प्रथम साडेसात हजार रुपये दिलेल्या क्रमांकावर भरा असे त्याला सांगण्यात आले. माने याने या आमिषाला बळी पडून एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या खात्यात साडेसात हजार रुपये भरले. आज दुपारी पुन्हा १८ हजार ९०० रुपये भरायला त्याला सांगण्यात आले. त्यासाठी त्याला वारंवार फोन येऊ लागला. माने याने आपल्या नातेवाईकांशी चर्चा केली असता त्यांना संशय आला म्हणून त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठले. पोलीस ठाण्यात आल्यावरही माने यांना सातत्याने पैसे भरण्यासाठी संपर्क साधला जात होता. यानंतर दत्ताराम माने याने तक्रार दाखल केली .