छोटा नवाब तैमूर स्वतःला ‘श्रीराम’ समजतो

taimure

मुंबई : एखाद्या स्टार पेक्षा कमी नसतो तैमूर आली खानचा अंदांज, करीना आणि सैफ अली खानचा मुलगा तैमूर सेलेब्रिटीपेक्षा कमी नाही. तैमूरचे फोटोज सोशल मीडियावर शेअर करताच तैमूरच्या त्या फोटोजवरती लाईक्सचा पाऊस पडतो. अशातच सध्या तैमूरचा क्रिकेट खेळतानाचा एक फोटो सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे, व त्याची बरीच चर्चा देखील होतेय.

तैमूर बाबत अजून एक बातमी समोर येत आहे. सैफ अली खानने काही दिवसांपूर्वी तैमूरची मजेशीर बाब चाहत्यांसोबत शेअर केली आहे. सैफ ने असे सांगितले कि, तैमूरला रामायण बगायला फार आवडते, तैमूरला रामायण आवडायचे कारण म्हणजे छोटा नवाब तैमूर स्वतःला श्रीराम समजतो.

सैफने रेडीफला दिलेल्या एका मुलाखतीत तैमूर बाबत काही गोष्टी शेअर केल्या होत्या, लॉकडाऊन काळात पौराणिक मालिका रामायण दाखवायला सुरुवात झाल्यानंतर तैमूरला रामायण बगायला आवडू लागले होते. हि मालिका पाहिल्यावर तैमूरला तो श्रीराम असल्याचे वाटू लागले आहे. असे सैफने आपल्या मुलाखती दरम्यान सांगितले.

महत्वाच्या बातम्या:-