श्रीलंका दौऱ्यात ‘या’ युवा खेळाडुंना आंतरराष्ट्रीय पदार्पणाची मिळणार संधी

मुंबई : भारतात सुरु आसलेली आयपीएल स्पर्धा कोरोनाच्या प्रादुर्भानामुळे स्थगित करण्यात आली. यानंतर काही दिवसातच बीसीसीआयने इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. जुन महिन्यात भारतीय संघ न्युझीलंड विरुद्ध जागतीक कसोटी चॅम्पीयनशीप स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. यानंतर भारतीय संघ जुलै महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर ३ एकदिवसीय आणि ५ टी-२० सामने खेळायला जाणार आहे.

श्रीलंकेच्या या दौऱ्यात बीसीसीआयने भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या दौऱ्यात सलामीवीर रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहली उपस्थीत नसणार आहे. त्यामुळे या दौऱ्यात भारतीय संघाकडुन अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय पदार्पण करु शकतात. या दौऱ्यात आरसीबीचा सलामीवीर देवदत्त पडिक्कलला सलामी साठी संधी मिळण्याची शक्यता आहे. त्याच्यासोबत शर्यतीत सीएसकेचा ऋतुराज गायकवाडही आहे. तसेच गोलंदाजीत आरसीबीचा हर्षल पटेलचे नाव निश्चीत मानले जात आहे. तर फिरकीपटुमध्ये संघाला पंजाबचा रवि बिश्नोईचा विचार केला जाऊ शकतो.

या दौऱ्यात भारतीय संघाचे नेतृत्वावरुन अजुनही कोणतेही नाव निश्चीत करण्यात आलेले नाही. सलामीवीर शिखर धवन अथवा हार्दिक पांड्या ही दोन नावे प्रामुख्याने समोर येत आहे. तर सलामीवीरासाठी पृथ्वी शॉची निवड झाली तर पडिक्कल आणि ऋतुराजला मधल्या फळीत खेळावे लागेल. तेव्हा नवोदीत खेळांडुना या दौऱ्यात चांगली कामगीरी करण्यची पुरेपुर संधी मिळणार आहे. यात कोणता युवा खेळाडू ही स्पर्धा गाजवतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल

महत्त्वाच्या बातम्या

IMP