‘या’ खेळाडूने ऋषभ पंतला पाचव्या क्रमांकावर खेळवण्याचा दिला सल्ला

पंत

मुंबई : ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना द गॅबा स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताने ३ विके्टसने विजय मिळवत इतिहास रचला आहे. या विजयासह भारताने २-१ ही मालिका जिंकली आहे. भारताचा हा ऑस्ट्रेलियन भूमीतील सलग दुसरा मालिका विजय आहे.

याचबरोबर गेल्या ३३ वर्षांचा ऑस्ट्रेलियाचा ब्रिस्बेन कसोटीत अपराजित राहण्याचा विक्रमही भारताने खंडीत केला आहे. मालिका 1-1 ने बरोबरीत होती. भारताला विजयाची संधी होती. यामुळे टीम इंडिया आज पाचव्या दिवशी कसा खेळ करणार याकडे सर्वांचेच लक्ष होते. अखेर पंतच्या चौकाराने टीम इंडियाला दणदणीत विजय मिळवून दिला.

पाचव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या ऋषभ पंतने नाबाद 89 रनची खेळी केली. ऑस्ट्रेलियाने ठेवलेल्या 328 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने पंतला पाचव्या क्रमांकावर बॅटिंगला पाठवलं. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने ऋषभ पंतला वरच्या क्रमांकावर बॅटिंगला पाठवण्याचा सल्ला दिला होता, अशी प्रतिक्रिया भारताचे बॅटिंग प्रशिक्षक विक्रम राठोड  यांनी दिली.

‘पहिल्या टेस्टमध्ये भारताचा पराभव झाल्यानंतर या सगळ्याची सुरूवात झाली. विराटने भारतात जाण्याआधी अजिंक्य रहाणेसोबत चर्चा केली होती. ऋषभला पाचव्या क्रमांकावर पाठवण्याची कल्पना विराटची होती. कारण डाव्या आणि उजव्या बॅट्समनमुळे संतुलन मिळतं, असं विराट म्हणाला होता. गाबाच्या निर्णायक टेस्टआधी पंतच्या बॅटिंग क्रमांकाबाबत चर्चा झाली,’ अशी प्रतिक्रिया राठोड यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या