घराणेशाही कधीच लोकशाहीचं कल्याण करू शकत नाही – नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा घराणेशाहीच्या मुद्यावरून कॉंग्रेसवर टीका केली. एका कुटुंबाची पुजा करणारे, कधीच लोकशाहीची पुजा करू शकत नाहीत, असं म्हंटल आहे. इस्टर्न पेरिफेरल एक्स्प्रेस वे चे उद्घाटन केल्यानंतर ते उत्तर प्रदेशातील बागपत येथे बोलत होते. मोदी म्हणाले की, या लोकांनी सर्जिकल स्ट्राईक्सला देखील नाकारले तसेच आंतरराष्ट्रीय एजन्सीज भारताचे कौतुक करत असताना त्यांनी या संस्थांच्या कामावरच संशय घेतला. जो पक्ष कायमच घराणेशाहीवर चालतं आला आहे. तो लोकशाहीत लोकांचं भलं कस करणार असा सवाल देखील यावेळी मोदींनी केला आहे.

पुढे बोलताना मोदी म्हणाले की, काँग्रेस आणि त्यांचे सहकारी पक्ष विकासकामाबाबत नेहमीच काहीही बोलत असतात आणि नेहमीच मागासवर्गीयांच्या आणि आदिवासींच्या विकासात अडथळे येतील असे वागत असतात. पायाभूत सुविधा निर्माण करताना त्यात जात, पंथ, धर्म आणि आर्थिक स्थिती यानुसार कधीही फरक केला जात नाही. दलितांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांविरोधातील खटले चालवण्यासाठी विशेष कोर्टांची स्थापना केल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.

तसेच शेतकऱ्यांबाबत बोलताना मोदी म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील आहे. त्यांचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही काम करीत आहोत. दरम्यान, योगी सरकारच्या काळात पोलिसांनी पकडण्याआधीच गुन्हेगार स्वतःहून आत्मसमर्पण करीत असल्याचे सांगत त्यांनी युपी सरकारचे देखील कौतुक केले.