जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमची इंलंडसह भारताच्याही क्रिकेटपटूंना भूरळ, पहा ट्विट्स

रोहित शर्मा

अहमदाबाद : इंग्लंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील सध्या भारत-इंग्लंड संघात कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील शेवटचे दोन सामने अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियममध्ये  होणार आहेत. नव्याने बांधण्यात आलेलं मोटेरा स्टेडियम हे जगातलं सगळ्यात मोठं क्रिकेट स्टेडियम आहे. या स्टेडियममध्ये एकावेळी 1 लाख 10 हजार प्रेक्षक बसू शकतात.

या स्टेडियममध्ये होणाऱ्या पहिल्याच टेस्ट मॅचसाठी बीसीसीआय पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि क्रीडा मंत्री किरेन रिजिजू  यांना बोलावण्याच्या तयारीत आहे. मोटेरा स्टेडियमवर होणारी तिसरी टेस्ट मॅच डे-नाईट असणार आहे. मागच्याच वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या स्टेडियमचं उद्घाटन केलं. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर असताना याच स्टेडियममध्ये नमस्ते ट्रम्प हा कार्यक्रम झाला होता.

दरम्यान, भारत आणि इंग्लंड संघांच्या खेळाडूंना या स्टेडियमने भूरळ पाडली आहे. अनेक क्रिकेटपटूंनी या स्टेडियममधील फोटो आणि व्हिडिओ ट्विट केले आहेत. रिषभ पंतने या स्टेडियमचे फोटो शेअर करताना लिहिले आहे की ‘नवीन सुविधांसह तयार झालेल्या मोटेरा स्टेडियममध्ये मस्त वाटत आहे. अहमदाबादमध्ये क्रिकेटसाठी जागतिक दर्जाच्या सुविधा पाहून चांगले वाटत आहे. २४ फेब्रुवारीला या मैदानात पाऊल ठेवण्यास उत्सुक आहे.’

महत्वाच्या बातम्या