अखेर कोरोनाचं मूळ शोधण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना चीनमध्ये दाखल

जागतिक आरोग्य संघटना

बीजिंग: जगभरात कोरोनाचा प्रसार होवून आता एक वर्ष उलटून गेल आहे. मृत्यूच थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा नेमका फैलाव कोठून झाला ? कोणत्या प्राण्यापासून झाला ? याचा वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे शोध लागला नाही. चीनमधील वुहान शहरातील मांस बाजारातून कोरोना जगभरात पसरला असेल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. मात्र, त्यास योग्य असे पुरावे अद्यापही मिळाले नाहीत. याच सर्व गोष्टींचा शोध घेण्यासाठी आता जागतिक आरोग्य संघटनेचे पथक वुहान शहरात दाखल झाले आहे.

सुरुवातीला चीन कडून कोरोना चीन मधून आला हे मान्य करण्यात आले नव्हते त्यामुळे जगभरातून चीनवर आरोप होत होते. विशेषतः अमेरेकेकडून चीनवर कोरोना विषाणू फैलवल्याचे आरोप कारण्यात आले होते. याचा अमेरिका शोध घेत असल्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प म्हणाले होते,

या विषाणूची निर्मिती चीनच्या प्रयोगशाळेत केली का याबद्दल राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्याशी झालेले माझे बोलणे आता उघड करणार नाही. अमेरिकेने कर्मचाऱ्यांसाठी चीनकडून काही लाख पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट मागविली आहेत. चीनने अमेरिकेला हजारो व्हेंटिलेटरही पाठविले होते. त्यामुळे ट्रम्प आपले हितसंबंध सांभाळूनच चीनवर टीका करत होते.

त्यांनतर आता सिंगापूर शहरातून डब्ल्युएचओचे पथक वुहानमध्ये येत असल्याची माहिती चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्ते लाओ लिझिन यांनी दिली. कोरोना विषाणूचा प्रसार चीनमधून झाला हे मानण्यास चीन तयार नव्हता. त्यामुळे चीनने तपासाची परवानगीही दिली नव्हती. त्यामुळे ऑस्ट्रेलिया, अमेरिका, कॅनडासह अनेक देशांशी चीनचे संबंध बिघडले. मात्र, आता चीनने तपास पथकाला परवानगी दिली आहे. जगभरात आत्तापर्यंत सुमारे ९२ कोटी ३१ लाखांपेक्षा अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर सुमारे १९ लाख ७७ हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

महत्वाच्या बातम्या