fbpx

‘साहेबांचा शब्द अंतिम असतो, तोच निर्णय मानून सर्वजण कामाला लागतात’

ajit pawar

टीम महाराष्ट्र देशा – साताऱ्यामधील दोन्ही राजेंचे मनोमिलन कानावर पडलेलं आहे. पवार साहेबांनी सर्वांना एकाच गाडीत घातलेलं आहे. मनोमिलनाचा पहिला गियर पडलाय. दुसरा, तिसरा आणि चौथा पण गियर पडेल. साहेबांचा शब्द अंतिम असतो, तोच निर्णय मानून सर्वजण कामाला लागतात, असे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार कराड येथे पत्रकारांशी बोलताना म्हणले.

साताऱ्यातील लोकसभेचा प्रश्न लवकरच संपेल, असेही अजित पवार यावेळी म्हणले.

यावेळी पवार म्हणले की, साताऱ्यामधील दोन्ही राजेंचे मनोमिलन कानावर पडलेलं आहे. पवार साहेबांनी सर्वांना एकाच गाडीत घातलेलं आहे. मनोमिलनाचा पहिला गियर पडलाय. दुसरा, तिसरा आणि चौथा पण गियर पडेल. साहेबांचा शब्द अंतिम असतो, तोच निर्णय मानून सर्वजण कामाला लागतात.