‘आपलं काम नंतर करू’ हे वाक्य लटकावू शकते कोपर्डीतील आरोपींना फासावर ?

copardi murder

टीम महाराष्ट्र देशा – अहमदनगर: कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने तीनही आरोपीना दोषी धरलं आहे. दरम्यान आज आरोपींना काय शिक्षा देण्यात यावी यावर युक्तिवाद करण्यात आला. यावेळी बचाव पक्षाच्या वकिलांच्या युक्तिवादावर उत्तर देताना विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी आरोपीना फाशीच कशी होऊ शकते याबाबद खालील मुद्दे मांडले आहेत.

– 11 जुलैला आरोपींनी पीडितेला अडवले होते. आरोपी जितेंद्र शिंदेनं हात ओढून अत्याचारासाठी चारीकडे खेचलं. यावेळी मैत्रीण रडली. त्यावेळी त्यांनी बलात्कार करण्याचा कट रचला

Loading...

– आरोपी जितेंद्र शिंदे यांने बलात्काराच्या उद्देशाने पीडितेचा हात ओढला. पीडिता आणि तिच्या घाबरलेल्या मैत्रिणीला पाहून भवाळ आणि भैलुमेनं  कुलशीत हास्य केले

– ‘झोपायला येते’ का अशा प्रकारे आरोपींनी केलेलं वक्तव्य आणि त्यांच्या कृतीतून आरोपींची मानसिक विकृती कळते.

– पीडित आणि मैत्रिणीच्या आवाजाने लोक जमा होऊ शकतात आपलं काम नंतर करू’ भैलुमे आणि भावळचे हे संभाषण कट रचल्याचे सिद्ध करते.

– 13 जुलै 2016 ला संध्याकाळी 7 वाजता मुलगी आजोबांकडे मसाला आणायला जाताना तिन्ही आरोपी तिच्यावर पाळत ठेवून होते.

– प्रत्यक्षदर्शीनुसार पीडित मुलगी विवस्त्र मरण अवस्थेत होती तर आरोपी जितेंद्र शिंदे तिच्या जवळ होता. लोक आल्याने शिंदे पळून गेला. दरम्यानच्या काळात भवाळ आणि भैलूमे यांनी आरोपी शिंदेला पळून जाण्यासाठी दुचाकी तयार ठेवली होती.

– शिंदे पीडितेवर अत्याचार करताना भवाळ आणि भैलूमे कोण येत का याच्यावर पाळत ठेवून होते

– पीडितेवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्यानंतर रस्त्याच्या एका बाजूला 150 फुटावर तिचे कपडे तर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला तिचा मृतदेह होता. यावरूनच आरोपींची विकृती कळते.

– 13 जुलैला घटनेवेळी आरोपी शिंदेनं दोघांना भवाळ आणि नितीन भैलूमे यांना मोबाईल फोनवर मिस्ड कॉल केला होता. यावेळी भवाळ आणि नितीन भैलूमेनं उत्तर दिले नाही.

– बलात्कार प्रकरणात शिक्षा होऊनही सर्व आरोपींना आपल्या कृत्याचा पश्चाताप किवां दुःख नाही, शिंदेनं शिक्षा एक दिवस काय आणि हजार दिवस काय असं म्हटलंय.

-बचाव पक्षाकडून आरोपींचे मानसिक संतुलन बिघडल्याच सांगण्यात आलं होतं. मात्र सर्व आरोपी प्रौढ होते त्यांना कृत्याची जाणीव होती.आरोपी शिंदे याने पीडितेच्या अंगावर घेतलेले अमानुष चावे,मोडलेले तिचे दोन्ही हात हे कृत्य पाशवी आहे.

हे सर्व पाहता आरोपी नंबर एकला फाशी तर कट कारस्थान केल्याचा आरोप असणाऱ्या इतर दोघांनाही फाशीच देण्यात यावी कारण ते नाटकाचे डायरेक्टर आहेत.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी तर शहा तानाजींच्या रुपात; शिवसेनेच्या ढाण्या वाघाची पहिली प्रतिक्रिया
कोणाशीही आणि कशीही युती करेन पण एकदा दिल्लीला जाणारच : महादेव जानकर
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
मुस्लिमांच्या आग्रहामुळे शिवसेनेसोबत सत्ता स्थापन केली?
तुम्ही काय केलं ते आधी सांगा;शिवेसेनेचा देवेंद्र फडणवीसांना सवाल
चव्हाणांच्या गौप्यस्फोटावर खडसे  म्हणतात...
बाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा
तर शिवसेनाही स्वबळावर लढायला तयार; सर्व ११५ जागा लढवणार
मुंबईची माहिती नाही तेच 'नाईट लाईफ'ला विरोध करत आहेत - प्रकाश आंबेडकर
भागवत यांना किती मुलं आहेत हे मला माहित नाही; त्यांनी नसत्या उठाठेव करू नये