नाणार प्रकल्प : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला दिल्लीत कवडीचीही किंमत नाही- उद्धव ठाकरे

udhav thakre

टीम महाराष्ट्र देशा- नाणार प्रकल्प गुजरातला न्यायचा आहे तर खुशाल घेऊन जा. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आणि नाणारवासियांना प्रकल्प होणार नाही असा शब्द दिला होता मात्र केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सौदी सरकार बरोबर परस्पर करार केला. त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला दिल्लीत कवडीचीही किंमत नाही हे समोर आलं असल्याची घणाघाती टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाणारमध्ये  केली आहे.आज आम्ही शांततेच्या मार्गाने चाललो आहे, पण तुम्ही जुलूम केला तर आम्हाला देखील बेकायदेशीर मार्गाने जावं लागेल असा इशारा देखील ठाकरे यांनी दिला .

उद्धव ठाकरेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे – 

  • जमिनींची मोजणी करायला येणाऱ्यांना आडवा, तुमच्या पद्धतीने आडवा.
  • हा प्रकल्प गुजरातला न्यायचा आहे तर खुशाल घेऊन जा.
  • मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आणि नाणारवासियांना प्रकल्प होणार नाही असा शब्द दिला होता मात्र केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सौदी सरकार बरोबर परस्पर करार केला. त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला दिल्लीत कवडीचीही किंमत नाही हे समोर आलं
  • नाणार जमिनीचा व्यवहार हा भूमाफियांचा घोटाळा
  • कोकणाला समुद्र किनारा लाभलाय, निसर्ग लाभलाय हा काय आमचा गुन्हा आहे?
  • तुम्ही आमच्या जमिनी खरेदी करु शकता पण आमच्यातील देशभक्ती तुम्ही खरेदी करु शकणार नाही .
  • आज आम्ही शांततेच्या मार्गाने चाललो आहे, पण तुम्ही जुलूम केला तर आम्हाला देखील बेकायदेशीर मार्गाने जावं लागेल.
Loading...