fbpx

खिशात बसेल एवढ्या छोट्या बाळाला महिलेने दिला जन्म

नॉटिंघमशायर – इंग्लंडच्या नॉटींघमशायरमध्ये राहणाऱ्या एका महिलेने चक्क खिशात बसेल एवढ्या छोट्या बाळाला जन्म दिला आहे. हे बाळ चक्क तुमच्या तळहातावर देखील निवांत झापू शकेल. त्यामुळे हे बाळ पाहून फक्त सामान्य लोकच नव्हे, तर डॉक्टर सुद्धा हैराण झाले आहेत. आपल्या गर्भधारणेच्या 26 व्या आठवड्यात या बाळाला महिलेने जन्म दिला आहे.

 

त्या महिलेचे नाव हाना रोस असे आहे. तिला आपल्या गर्भधारणेच्या दरम्यान खूप समस्यांना सामोरे जावे लागले होते. एका आजारामुळे बाळाला वाचवणे कठिण असल्याचे डॉक्टरांनी हाना आणि तिच्या पतीला सांगितले. तसेच हानाचे अशा परिस्थितीमध्ये आरोग्य लक्षात घेता गर्भपात करण्याचा सल्ला दिला. पण हानाने गर्भपातासाठी नकार दिला. त्याच दरम्यान तिची गर्भपात करण्याची मर्यादा निघुन गेली होती. 26व्या आठवड्यानंतर हानाची कृत्रिम प्रसुती करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतल्यानंतर हानाने जन्म दिलेल्या बाळाचा आकार पाहून डॉक्टर आश्चर्यचकित झाले. ते रुग्णालयातील एका इंजेक्शनच्या आकाराचे होते. बाळ एवढे लहान होते, की त्याला कडेवर नाही तर फक्त तळहातावर घ्यावे लागत आहे.

 

गर्भधारणा झालेली असताना हानाला सेपसिस आणि मॅनिनजायटिस नावाचे आजार होते. अशात मुलाच्या जीवंत राहण्याची शक्यता खूपच कमी होती, असे हानाची प्रसुती करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.