“शाहरुख में पूरा हिंदुस्तान बसता है”; कवितेद्वारे स्वराने शाहरुखला दर्शवला पाठिंबा

स्वरा

मुंबई :  बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणी ताब्यात घेण्यात आलं आहे. त्याची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून (NCB) चौकशी करण्यात आली. आर्यन खानला अटक झाल्याने बॉलिवूडमध्ये सध्या खळबळ माजली असून अनेक सेलिब्रिटी शाहरुख खानला पाठिंबा देत आहेत. यातच आता आपल्या परखड वक्त्यव्यामुळे चर्चेत असलेली अभिनेत्री स्वरा भास्करने कविता शेअर करत शाहरुखला पाठिंबा दर्शवला आहे.

स्वराने प्रसिद्ध कवी अखिल कटयाल यांची एक कविता रिट्वीट करत लिहिले आहे की, “वो कभी राहुल है तो कभी राज, वो कभी चार्ली है तो कभी मॅक्स, सुरिंदर भी वो हॅरी भी वो, देवदास भी और वीर भी, राम, मोहन, कबीर भी। वो अमर है समर है। रिजवान, रहीम, जहांगीर भी। शायद इसलिए कुछ लोगों की हलक में फंसता है, कि एक शाहरुख में पूरा हिंदुस्तान बसता है।” त्यांची ही कविता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

दरम्यान, आर्यन गेल्या चार वर्षांपासून ड्रग्जचं सेवन करत असल्याचीही माहिती समोर आली आहे. मुंबई ते गोवा या तीन दिवसांच्या क्रूझ सफारीवर श्रीमंत घरची मुले सहभागी असल्याने अमली पदार्थ आणि रेव्ह पार्टीचे आयोजन असल्याचा संशय एनसीबीला आला त्यानंतर सापळा रचून एनसीबीने या क्रूझवर प्रवेश केला. यावेळी एनसीबी अधिकाऱ्यांनी अचानक छापे घालत कोकेन, चरस, हशीश, एमडी, एमडीएमए जप्त केले व क्रूझवरील तरुणांना ताब्यात घेतले आहे.

२ ऑक्टोबर पासून अटकेत असलेल्या आर्यनच्या सुटकेसाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. मात्र त्याला अद्याप जामीन मिळाला नाही. आता त्याच्या जामीन अर्जावर उद्या १३ ऑक्टोबर रोज सुनावणी होणार असून आता यावेळी आर्यनच्या कोठडीत वाढ होणार की सुटका? याकडे अनेकांचे लक्ष राहणार आहे.

महत्वाच्या बातम्या