‘सरसकट लॉकडाऊन अन्यायकारक; मंत्री ठाकूर यांचे पत्र म्हणजे ठाकरे सरकारला चपराक’

yashomati thakur

मुंबई : राज्यात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः थैमान घातले आहे. त्यामुळेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोमवार पासून राज्यभरात मिनी लॉकडाऊन आणि वीकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मुंबईतील कोरोना रुग्णसंख्याही झपाट्याने वाढतेय.

दरम्यान,अमरावती जिल्ह्यात व्यापाऱ्यांचा लॉकडाऊनला विरोध वाढू लागला आहे.या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातील लॉकडाऊन शिथिल करण्याबाबत अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे.

अमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी असल्याने लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी केली असून पालकमंत्री यशोमती ठाकूर ह्या मुंबईला रवाना झाल्या असून उद्या मुख्यमंत्री यांना स्वतः भेटून ही मागणी करणार आहेत.

तर, यशोमती ठाकूर यांच्या या मागणीमुळे आता भाजप नेत्यांनी मात्र सरकारच्या निर्णयावर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडलं आहे. ‘ठाकूर यांनी ठाकरेंना हाणले… ठाकरे मंत्रिमंडळातील मंत्री यशोमती ठाकूर यांनी आकडेवारीनिशी आपल्याच सरकारचे वाभाडे काढले आहे. कोणताही अभ्यास न करता सरसकट लॉकडाऊन कसा अन्यायाने लादला आहे हे दर्शविणारे यशोमती ठाकूर यांचे पत्र म्हणजे ठाकरे सरकारला घरातून मिळालेली सणसणीत चपराक आहे…’ असं ट्विट भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या