पूर्ण धंदा बसला होता पण लोकमंगलमुळे पुन्हा उभा राहिलो; नितेश अपराध यांची ‘कोरोना’ कहाणी

business image

सोलापूर : सोलापूरच्या भवानी पेठेतल्या हनुमान नगरात तयार कडक भाकरी विकण्याचा व्यवसाय करणारे नितेश बाबासाहेब अपराध यांचा, कोरोनच्या पार्श्‍वभूमीवर जवळ जवळ बंदच पडलेला धंदा लोकमंगल पतसंस्थेच्या उदार मदतीने पुन्हा सुरू झालाय. मधल्या काळात आलेली निराशा पूर्ण पळाली आहे आणि जगण्याचे बळ मिळाले आहे. माननीय सुभाषबापू देशमुख यांच्या उदार भूमिकेमुळे हे सारे घडले असे अपराध म्हणाले.

अपराध हे पूर्वी एका टॉवेल कारखान्यात काम करीत असत पण कधी कधी एखाद्या हॉटेलात गेले की तिथे भाकरी विकल्या जातात हे पहायचे. आपली पत्नी मीरा हीही चांगल्या भाकरी करते तेव्हा आपणही भाकरीचा व्यवसाय का करू नये असा विचार त्यांच्या मनात आला आणि २००७ साली त्यांनी नोकरी सोडून कडक भाकरी, बाजरीच्या भाकरी, खाकरा, चटणी विकायला सुरूवात केली. धंदा चांगला चालला. हळुहळू वाढला. आधी स्वत:चा रोजगार स्वत: निर्माण करणे हा हेतू होता पण २०२० पर्यंत १४ बायकांना काम दिले. दररोज हजार ते दीड हजार रुपये कमवायला लागलो. दुकानदारांना आणि हॉटेलांना माल सप्लाय करायला स्वत:चा टेम्पो घेतला. पण करोनाने सगळा खेळ बिघडवला.

करोनाचा प्रसार व्हायला लागला आणि प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर करून खायचे पदार्थ विकायला आणि हॉटेलांना बंदी केली. आता काय करणार असा प्रश्‍न उभा राहिला. स्वत:ची काही बचत होती. ती कोरून कोरून वापरायला सुरूवात केली. एप्रिल महिन्यात तोही साठा आटत चालला. आम्हाला आमचे पोट भरणे कठीण वाटायला लागले कारण सगळे भांडवल जिरायला लागले होते. त्यापेक्षा त्या १४ महिलांची अवस्था वाईट होती कारण त्यांची कुटुंबे त्यांच्यावर अवलंबून होती. हातावर पोट असलेल्या आमच्या या सहकारी भगिनींचे तर पहिल्याच महिन्यात वांदे सुरू झाले. पण मीरा आणि नितेश अपराध यांनी केवळ स्वत:चा विचार न करता, ज्यांच्या कष्टावर आपला व्यवसाय वाढला आहे त्यांना वार्‍यावर सोडायचे नाही असा निर्धार केला.

अपराध यांनी आपल्या जवळची सारी पुंजी लावून आणि आपल्या प्रतिष्ठेचा वापर करून एक पिठाची गिरणी चालवायला घेतली. तिच्यातून आलेल्या कमायीचा वापर करून निदान या भगिनींची दोेन वेळची जेवणाची तरी सोय व्हावी एवढी मदत त्यांना केली. स्वार्थी धोरण अवलंबिले नाही.

नसता त्यांना कामावरून काढता आले असते आणि तुमचे तुम्ही कसे भागवायचे ते भागवा असे म्हणून हात झटकता आले असते. पण संकटाच्या काळात जी काही चटणी भाकरी मिळतेय ती सर्वजणच मिळून खाऊ असा बंधूभाव जोपासला. तीन महिने फार वाईट गेेले आणि आता हळुहळू व्यवहार पूर्ववत होण्याची आणि धंदा पुन्हा सुरू होण्याची चिन्हे दिसायला लागली मात्र आता पुन्हा धंदा सुरू करायचा तर धान्य, शेंगादाणे, मैदा हे सगळे खरेदी करावे लागणार.

काही प्रमाणात का होईना पैसा लागणार. तो कोठून आणायचा ? बँकांकडे गेलो तर बँका नाना प्रकारच्या अटी घालणार. तेव्हा धंदा सुरू होणार याची आशा निर्माण झाली मात्र त्यासाठीचे भांडवल कोठून आणायचे असा प्रश्‍नही निर्माण झाला. तेवढ्यात अशा प्रसंगी लोकमंगल सहकारी पतसंस्था अशी मदत करते असे कळले.

तडक साखर पेठेतल्या शाखेत गेलो. सीईओ संभाजीदादा पाटील यांना भेटलो. त्यांनी चौकशी केली. आधी तुमचा धंदा सुरू होता ना, असे विचारले. आधी धंदा सुरू होता आणि चांगला चालला होता याचा अर्थ तुमच्याकडे कौशल्य आहे, ग्राहक तयार आहे आणि तुम्ही नेकीने धंदा करता हे दिसतच आहे. मग एवढे सगळे असल्यावर तुम्हाला पुन्हा उभे करण्यासाठी कर्ज देण्यात काहीच अडचण नाही असे म्हणत दोन लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले.

आता पुन्हा धंदा सुरू झाला आहे. ६० टक्के धंदा परत मिळाला आहे. हॉटेल सुरू झाल्यास सगळे पूर्ववत होईल. १४ पैकी ९ महिला कामाला आल्या आहेत. आता सगळ्याच येतील याची खात्री आहे. त्यांनी पुन्हा एकदा लोकमंगल पतसंस्थेला आणि सुभाषबापू देशमुख यांना धन्यवाद दिले. बापूंची ही मदत केवळ याच व्यवसायात नाही तर अनेकदा समाजात अनुभवाला येते असे अपराध म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:-