लहरी मोदी सरकारने कांद्यावरची निर्यात बंदी तात्काळ मागे घ्यावी

Rupali Chakankar

पुणे : आज राज्यभरात राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या वतीने केंद्र सरकारला कांदा पाठवून आंदोलनाच्या माध्यमातून निषेध व्यक्त केला जात आहे. जगभरात लॉकडाऊन असताना, गारपीट, पाणी टंचाई, दुष्काळ, रोगराई या नैसर्गिक आपत्तींना तोंड देत, अनेक आव्हानांचा सामना करीत शेतकरी वर्गाने कांदा उत्पादन घेतले, चार पैसे हातात मिळतील असं वाटत असतानाच लहरी केंद्र सरकारने तातडीने कांदा निर्यात बंदी बाबत निर्णय घेतला. या निर्णयामुळे शेतकरी उध्वस्त होत असून मुंबई जवळील उरण बंदरावर ५ लाख मेट्रिक टन कांदा पडून आहे.

जवळपास साडेबाराशे कोटींची उलाढाल थांबली आहे, हा कांदा खराब झाला तर याला जबाबदार कोण?? असा प्रश्न केंद्र सरकारला राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी यावेळी विचारला आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी धडे देतात आणि त्याचवेळी शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेतात, मग शेतकरी कसा आत्मनिर्भर होणार? राज्यपालांनी ज्याप्रमाणे महाराष्ट्र पोलिस आणि महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांना चर्चेसाठी वेळ दिली तशीच वेळ माझ्या कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना द्यावी व त्यांच्या अडचणी केंद्रापर्यंत पोहचवाव्यात. असा टोला रुपाली चाकणकर यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील बळीराजाने पिकविलेला कांदा भेट दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या लेकी म्हणून आम्ही निवेदनाच्या माध्यमातून विनंती करतो की, आपण कांदा निर्यात बंदी तात्काळ मागे घ्यावी.

पहा व्हिडिओ :

महत्वाच्या बातम्या :