मॉब लिंचिंगच्या घटनांना आळा घालण्यासाठी व्हॉट्स अॅपने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

टीम महाराष्ट्र देशा – देशभरात व्हॉट्स अॅपवरून पसरलेल्या अफवांमुळे चिंमॉब लिंगसारखे गंभीर प्रकार घडल्यानंतर केंद्र सरकारने व्हॉट्स अॅपवर टीका करत नोटीस बजावली होती.यानंतर व्हॉट्स अॅपने मोठा निर्णय घेतला असून यापुढे एक मेसेज केवळ पाचच जणांना फॉरवर्ड करता येणार आहे. देशभरात घडलेल्या मॉब लिंचिंग (जमावाकडून मारहाण)च्या घटनांना आळा घालण्यासाठी व्हॉट्स अॅपने मोठा निर्णय घेतला आहे.

bagdure

सरकारने व्हॉट्स अॅपला फेक न्यूज रोखण्यासंदर्भात परिणामकारक तोडगा काढण्यास सांगितले होते . मॉब लिंचिंगसारख्या घटना घडल्यास त्या अफवा ज्या माध्यमांतून पसरतात, त्या माध्यमांवर देखील गुन्हा दाखल होऊन कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाला केंद्र सरकारने व्हॉट्स अॅपला दिला होता.

नेमकं काय होईल एक मेसेज केवळ पाचच जणांना फॉरवर्ड केल्यावर ?
व्हॉट्स अॅपच्या भारतीय युजर्सना यापुढे एक मेसेज केवळ पाचच जणांना फॉरवर्ड करता येणार आहे. एक मेसेज पाच वेळा फॉरवर्ड झाला की कंपनी त्यावरचा फॉरवर्डचा आयकॉनच डिसेबल करणार आहे.

 

 

 

You might also like
Comments
Loading...