fbpx

आमदार बळीराम सिरस्कारांच्या प्रयत्नातून तालूक्यातील पाणी प्रश्न तूर्तास मिटला

mla baliram siraskar

पातुर/विठ्ठल येणकर: राज्यात बऱ्याच ठिकाणी सध्या हळूहळू पाणीटंचाई जाणवू लागली आहे. विशेषतः महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. काही ठिकाणी तर पाण्यासाठी नागरिकांना कित्येक किलोमीटर जावं लागत आहे. मात्र दुष्काळ हा फक्त निसर्गाचा कोप नसतो तर राजकीय इच्छाशक्तीच्या अभावी देखील बऱ्याच गावांना दुष्काळाचा सामना करावा लागतो. पातुर तालुका जिल्हा अकोला येथे देखील अशीच काहीशी परिस्थिती होती.

तालुक्यातील नागरिक भीषण पाणीटंचाईला सामोरे जात आहेत. चान्नी, मळसूर, खेट्री , शहापूर अन्य खेड्यांमध्ये पिण्यास पाणी नसल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. मात्र, स्थानिक भारिप आमदार बळीराम सिरस्कार यांच्या प्रयत्नातून विश्वमित्र प्रकल्पाचे पाणी सोडल्यामुळे तूर्तास पाण्याचा प्रश्न सुटला असुन गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

पातुर तालुक्यातील चोंडी धरणाचे पाणी पारस विद्युत प्रकल्पाला सोडल्यामुळे मार्गावर असलेल्या आलेगाव, चरणगाव, विवरा, सस्ती तसेच वाडेगाव या गावांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. तसेच विश्वमित्र प्रकल्पाचे पाणी सोडल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून गुरांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुद्धा मिटला आहे.

भारिप बहुजन महासंघाचे आमदार बळीराम सिरस्कार यांनी जिल्हाअधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांची भेट घेऊन तालुक्यातील पाणी टंचाईचे निवारण करण्याची मागणी केली होती.

1 Comment

Click here to post a comment