fbpx

भंडारदरा, निळवंडे धरणातून उद्यापासून पाण्याचं आवर्तन सोडण्यात येणार

टीम महाराष्ट्र देशा- भंडारदरा, निळवंडे धरणातून उद्या १७ जुलै पासून पाण्याचं आवर्तन सोडण्यात येणार असल्याचं अहमदनगर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी सांगितलं आहे. भंडारदरा धरणात चार हजार ७१३ दश लक्ष घन फूट तर निळवंडे धरणात एक हजार ७०६ दश लक्ष घन फूट पाणीसाठा आहे.

जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने निळवंडे धरणातून उद्या सकाळी सहा वाजता पिण्यासाठी १५०० घनफूट प्रतिसेकंद वेगाने आवर्तन सोडण्यात येईल. हे आवर्तन पाच ते सहा दिवसांचं असेल, असं आमच्या वार्ताहारानं कळवलं आहे.