मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (मुंबई) व्यवस्थापन अखेर अदानी समूहाच्या ताब्यात आले आहे. स्वतः गौतम अदानी यांनी याबाबत ट्विटरवर माहिती दिली. केंद्र -राज्य सरकार व सिडकोची मान्यता मिळाल्यानंतर मुंबई विमानतळाचे व्यवस्थापन जीव्हीकेकडून अदानी एअरपोर्ट होल्डिंगकडे देण्याचा मार्ग मोकळा झाला.
या निर्णयामुळे नवी मुंबई विमानतळाच्या उभारणीचे कामही अदानी समूहाकडे हस्तांतरीत होणार असल्याने अदानी एअरपोर्ट होल्डिंग ही विमानतळांचे व्यवस्थापन पाहणारी देशातील सर्वात मोठी कंपनी ठरली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते नितीन सरदेसाई यांनी एक ट्विट केले आहे. व्यवस्थापन कोणाचेही असो छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आवाज हा मराठी माणसाचाच असेल असे सांगितले आहे.
मुंबई विमानतळावरून GVK चे रेड्डी गेले आणि अदानी आले.
व्यवस्थापन कोणाचे ही असो पण छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर 'आवाज' हा मराठी माणसाचाच असेल हे लक्षात असू द्या.— Nitin Sardesai (@1nitinsardesai) July 15, 2021
‘मुंबई विमानतळावरून GVK चे रेड्डी गेले आणि अदानी आले. व्यवस्थापन कोणाचे ही असो पण छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘आवाज’ हा मराठी माणसाचाच असेल हे लक्षात असू द्या’ असा इशारा मनसे नेते सरदेसाई यांनी दिला आहे. दरम्यान, मनसेने मराठीचा मुद्दा दूर सारत आता हिंदूत्त्वाचा नारा दिलेला आहे. त्या अनुषंगाने पक्षाच्या झेंड्यातही बदल करण्यात आलेला आहे. पण आता नितीन सरदेसाई यांनी विमानतळ व्यवस्थापनाच्या मुद्द्यावरून ‘आवाज’ हा मराठीच असल्याचे सांगितल्याने पक्षाची भूमिका कोणत्या दिशेला जात आहे याचा अंदाज बांधणे अवघड आहे.
महत्वाच्या बातम्या
- योगींच्या राज्यात कावड यात्रेला परवानगी; सुप्रीम कोर्टाने मोदी सरकारकडे स्पष्टीकरण मागितले
- ‘लोकांच्या लक्षातही येणार नाही अशा प्रकारे मोदी सरकार खिसा कापत आहे’
- कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून चिंता व्यक्त
- पंतप्रधान मोदी वाराणसीत दाखल, १५०० कोटींच्या कामांचे लोकार्पण करणार
- पंतप्रधान मोदी युवकांना म्हणाले, ‘ज्याच्याकडे स्किल असेल तोच पुढे जाईल’