पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार दलित खासदारांची भेट

narendra modi

नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षातील खासदार स्वत:च्याच पक्षावर नाराज आहेत. अॅट्रॉसिटी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकालानंतर देशभर हिंसाचार उसळला होता. भारतीय जनता पक्षाने दलितांसाठी काहीच का केले नाही ? असा सवाल भाजपचेच खासदार करू लागले आहेत. त्यामुळे खासदारांची नाराजी भाजपसाठी आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मोठी अडचण ठरू शकते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी दलित खासदारांची भेट घेणार आहेत.

उत्तर प्रदेशातील दलित खासदार छोटेलाल खारवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची तक्रार केल्यानंतर आता आणखी एका दलित खासदाराने पंतप्रधानांना पत्र लिहून दलितांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. केंद्र सरकारने देशातील दलित लोकसंख्येसाठी काहीही केले नसल्याचा आरोप नागिना येथील भाजपा खासदार यशवंत सिंह यांनी केला आहे.

यापूर्वी खासदार छोटेलाल खारवार यांनी योगी आदित्यनाथाबद्दल पंतप्रधानांकडे तक्रार केली होती. योगींनी आपल्याला वाईट वागणूक दिली असा त्यांनी आरोप केला होता. अॅॅट्रॉसिटी कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर ज्याप्रकारे देशभरातील दलित समाज एकत्र आला, त्या पार्श्वभूमीवर या खासदारांनी स्वपक्षावरच टीका केली आहे.