संतप्त गावकऱ्यांनी ठोकले जिल्हा परिषद शाळेला टाळे

z.p. school locked by villagers

परतुर: वारंवार मागणी करून देखील परतूर तालुक्यातील मौजे गोळेगांव येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकांची भरती केली जात नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी चक्क जिल्हा परिषदेच्या शाळेलाच टाळे ठोकले आहे.जोपर्यंत पुर्ण शिक्षक भरले जाणार नाही, तोपर्यंत शाळा उघडणारं नाही असा आक्रमक पवित्रा गोळेगावच्या सरपंच सुंदराबाई घुंगासे आणि ग्रामस्थांनी घेतला आहे.

Loading...

सविस्तर माहिती अशी की गोळेगाव येथे विद्यार्थी संख्या 250 आहे. सध्या शिक्षक 4 आहेत आणि शिक्षकाचे पदे 7 मंजूर आहेत(मु.अ.1, पदवीधर शिक्षक 2, सहशिक्षक4 ) सध्या या गावातील जिल्हा परिषदेची इयत्ता 8वी पर्यत शाळा असुन पटसंख्या जवळपास 250 इतकी आहे , शिक्षक केवळ चारच आहेत.यामधील एक शिक्षक कार्यालयीन कामकाजात गुंतुन असतो.बाकीच्या 3 शिक्षकांवर आठ वर्गाच्या 250 विद्यार्थ्यांचा भार पडतो.शिक्षकांना कोणत्या वर्गाला अध्यापन करायचे असा प्रश्न असतो म्हणून एका खोलीत दोन वर्ग बसूनही एक शिक्षक कमीच पडतो यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे मागील एक वर्षापासुन गावकरी शिक्षकांची मागणी करत आहेत. जि.प.चे शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, सर्कल चे जि.प.सदस्य, पं.स.सदस्य, पालकमंत्री यांना अनेकदा निवेदन,मागणी व संपर्क केला असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले पण अधिकारी व राजकारणी या मागणीकडे सोईकरीत्या कानाडोळा करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. यावेळी सरपंच सौ.सुंदराबाई गंगाधर घुंगासे,सर्व ग्रामपंचायत सदस्य, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष श्री.दत्ता कोल्हे समितीचे सदस्य, उपाध्यक्षसदस्य व गावकरी उपस्थित होतेLoading…


Loading…

Loading...