‘महाराष्ट्र देशा’च्या बातमीनंतर या शाळेला मिळाले शिक्षक

टीम महाराष्ट्र देशा: गोळेगाव येथील संतप्त गावकऱ्यांनी शिक्षकांची संख्या कमी असल्याने शाळेला टाळे ठोकले होते. ही बातमी महाराष्ट्र देशाने सर्वात प्रसिद्ध केली होती, गोळेगाव येथे 8 वी पर्यंत जिल्हा परिषदेची शाळा असून तिथे 250 विद्यार्थी ज्ञानार्जन करतात, 8 शिक्षकांच्या जागांमध्ये 4 जागा रिक्त होत्या, तर 4 शिक्षक हा कार्यभार सांभाळत होते यातील एक शिक्षक हा कार्यलयीन कामात व्यस्त असतो महाराष्ट्र देशाने हे वृत्त प्रसिद्ध करताच येथील शिक्षण अधिकारी प्रकाश ढवळे यांनी त्याची दखल घेत गोळेगाव येथे तीन शिक्षकांची नियुक्ती केली आहे, केंद्रप्रमुख एस एस गंगावणे, पी. आर रायमुळे यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली त्यानंतर ए.ए.काटे, ए. बी कोठेकर आणि शेख अनिस या तुन शिक्षकांची नियुक्ती केली व तीन दिवस बंद असणारी शाळा शिक्षकांची तात्पुरती पूर्तता केल्यानंतर सुरू करण्यात आली यावेळी उद्धव डोळसे, माऊली गुंजकर,शेख अझहर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी गोळेगाव येथील ग्रामस्थांनी महाराष्ट्र देशाचे आभार मानले.

कोय होते प्रकरण ?

गोळेगाव येथे विद्यार्थी संख्या 250 आहे. मात्र, शिक्षक चारच होते. येथे शिक्षकाचे पदे 7 मंजूर आहेत (मु.अ.1, पदवीधर शिक्षक 2, सहशिक्षक4 ) मात्र,या गावातील जिल्हा परिषदेची इयत्ता 8वी पर्यत शाळा असुन पटसंख्या जवळपास 250 इतकी आहे , शिक्षक केवळ चारच होते. यामधील एक शिक्षक कार्यालयीन कामकाजात गुंतुन असतो. बाकीच्या 3 शिक्षकांवर आठ वर्गाच्या 250 विद्यार्थ्यांचा भार पडतो. शिक्षकांना कोणत्या वर्गाला अध्यापन करायचे असा प्रश्न होता, म्हणून एका खोलीत दोन वर्ग बसूनही एक शिक्षक कमीच पडतो यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. मागील एक वर्षापासुन गावकरी शिक्षकांची मागणी करत आहेत. जि.प.चे शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, सर्कल चे जि.प.सदस्य, पं.स.सदस्य, पालकमंत्री यांना अनेकदा निवेदन,मागणी गावकऱ्यांनी केली होती. पण अधिकारी व राजकारणी या मागणीकडे सरळ कानाडोळा करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला होता. ही बातमी महाराष्ट्र देशाने सर्वात आधी प्रसिद्ध करत गावकऱ्यांचा आवाज झोपेल्या प्रशासनापर्यंत पोहोचवला होता.

You might also like
Comments
Loading...