लोकसहभागातून सौंदरेला मिळतय ‘सौंदर्यपण’

विरेश आंधळकर : दहा – बारा वर्षापूर्वी गावात सतत छोट्या छोट्या कारणातून निर्माण होणारे वाद आणि त्यातून होणाऱ्या पोलीस केसेस यामुळे बार्शी तालुक्यातील सौंदरे हे गाव सतत तालुक्याच्या राजकारणात केंद्रभागी असायच. पुढे हळूहळू शिक्षण, शेती आणि इतर रोजगार धंद्यामुळे गावातील वाद कमी झाले . आता पुन्हा एकदा हेच गाव  तालुका आणि जिल्ह्यामध्ये चर्चिल जात आहे. मात्र, आता कोणत्याही भांडणामुळे नाही. तर लोकसहभागातून साकारत असलेल्या विकासामुळे. साधारण दोन ते अडीच हजार लोकसंख्येच हे गाव आहे . गावामध्ये जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत मराठी माध्यम शाळा . तसेच कै. सौ शोभाताई सोपल माध्यमिक विद्यालय या शाळेत आठवी ते दहावी पर्यंत शिक्षणाची उत्तम सोय आहे. याच बरोबर आता सेमी इंग्रजी माध्यमाची  महात्मा फुले प्राथमिक शाळादेखील सुरु झाल्याने शेतकरी कुटुंबातील मुलांना देखील दर्जेदार अस शिक्षण मिळत आहे. शिक्षणामध्ये प्रगती करत असतानाच कृषीक्षेत्रात हि येथील शेतकरी आज अग्रेसर बनले आहेत.. कांदा उत्पादनात तर नवनवीन विक्रम या गावाने घालून दिले आहेत. आज सौंदरेमधील अनेक युवक देश-परदेशात मोठ्या नौकऱ्यावर कार्यरत आहेत.

या सर्व गोष्टी होत असताना गावाचा विकास कुठेतरी कासव गतीने चालत होता. मात्र, आता जनजागृतीमुळे नागरिकांचा गावाच्या विकासात लोकसहभाग वाढला आहे. एकेकाळी दुष्काळी गाव म्हणून सौंदरेला बघितल जायचं पण यंदा हि परिस्थिती थोडी वेगळी पहायला मिळत आहे कारण ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ या योजने अंतर्गत  २०१६ – १७ आणि १७ -१८ मध्ये ५० लाख रुपयांची नालाबल्डिंगची कामे करण्यात आली आहेत. तसेच राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेद्वारे गावाच्या हद्दीतून जाणाऱ्या ओढ्यावर पाच ठिकाणी बंधारे बांधत पावसाळ्यात वाहून जाणार पाणी जागीच साठवण्याची सोय करण्यात आली आहे. यामुळे यंदा पहिल्या पावसातच या ओढ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची साठवण झाली आहे. नागरिकांमधून ५ लाख ६० हजारांच्या लोक वर्गणीतून ओढ्याच रुंदीकरण देखील करण्यात आल आहे.

 

soundare, taluka barshi, dist solapaur

पाण्याचा प्रश्न सुटत असताना सार्वजनिक शौचालयाचा प्रश्न देखील या ठिकाणी गंभीर आहे. मात्र सध्या शासनाच्या विविध योजनामधून सार्वजनिक तसेच वयक्तीक शौचालयांची उभारणी अंतिम टप्यात आली आहे. झोपडपट्टीमुक्त होण्याकडे देखील सौंदरेची वाटचाल सुरु आहे. गावामधील युवक पुणे- मुंबई सारख्या मेट्रो शहरांमध्ये जाऊन स्थिरस्थावर झाले असतानाहि ‘प्रयास ‘ या व्हाटसअॅप ग्रुपच्या माध्यमातून गावातील प्रत्येक उपक्रमांमध्ये सक्रीय सहभाग नोंदवत आहेत. लोकसह्भागा होण्यामध्ये या व्हाटसअॅप ग्रुपचा मोठा वाटा आहे.

यंदा राज्य सरकारकडून राज्यभरात ४ कोटी वृक्ष लागवडीच उदिष्ट ठेवण्यात आल आहे . या अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या कृषी सप्ताहामध्ये  दि ७ जुलै रोजी गावामध्ये विद्यार्थ्यांकडून जनजागृतीसाठी  कृषी दिंडी काढण्यात आली . यामध्ये चिमुकल्यांनी वेगवेगळ्या वेशभूषा करत नागरिकांना वृक्ष लागवडीचा संदेश दिला. याच बरोबर गावामध्ये एक हजार वूक्षांची लागवड देखील करण्यात आली आहे.

 

soundare, taluka barshi, dist solapaur

 

एकूणच शासनाकडून राबवल्या जाणाऱ्या सर्व योजना आणि नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद यामुळे आज खऱ्या अर्थाने  सौदरेला ‘सौंदर्यपण’ मिळत असल्याच चित्र आहे.

वृक्ष दिंडीतील एक मनमोहक दृश्य 

[jwplayer 49WMoOBS]