मनुष्यबळ कितीही लागूदे, गावं ५-६ दिवसात चकाचक झाली पाहिजे; महाजनांचे अधिकाऱ्यांना आदेश

blank

टीम महाराष्ट्र देशा : गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पुरामध्ये अनेकांच्या घरात पाणी घुसले आहे. त्यामुळे संसार उध्वस्त झालेले आहेत. पुराच्या पाण्यामुळे या भागात रोगराईचे नवीन संकट उभे राहिले आहे.

याच पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी बोलताना महाजन यांनी ‘शेकडो वर्षात झाला नाही इतका पाऊस यंदा काही दिवसात पडला. त्यामुळे नियोजन चुकलं किंवा तांत्रिक चूक झाली असं म्हणता येणार नाही, ही नैसर्गिक आपत्ती आहे असं विधान केले तसेच पुढे बोलताना नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मनुष्यबळ कितीही लागूदे, गावं ५-६  दिवसात चकाचक झाली पाहिजे असे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

पुढे बोलताना महाजन यांनी ‘सध्या आमचं लक्ष्य आरोग्य यंत्रणेकडे आहे. पुरामुळे घाण रस्त्यावर आली आहे, त्यामुळे रोगराई पसरण्याची भीती आहे. त्यासाठी अतिरिक्त डॉक्टर आणि औषधांची तयारी राज्य सरकारने केली आहे. सांगली आणि कोल्हापूरमध्ये सर्वकाही लवकरच पूर्वपदावर येईल असा विश्वास व्यक्त केला.

दरम्यान, राज्य सरकारतर्फे पूरग्रस्तांना १५४ कोटी रुपयांचा निधी मदत म्हणून देण्यात येणार आहे. हा निधी मृत व्यक्तींचे परिवार, जखमी तसेच पूरग्रस्तांना देण्यात येणार असल्याची माहिती सरकारतर्फे देण्यात आली आहे. त्यामुळे या बाधित नागरिकांना सरकारच्या आर्थिक मदतीमुळे झालेलं नुकसान भरून काढण्यास मदत होणार आहे त्यामुळेच सरकारने हा निर्णय घेतला आहे,

महत्वाच्या बातम्या