झिंग झिंग झिंगाट : ग्रामपंचायतीत मद्य पार्टी करणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्याला रंगेहात पकडलं

Desi daru

सोलापूर : राज्यात कोरोनाचा विषाणू थैमान घालत असल्याचे चित्र आहे. पुणे-मुंबई पाठोपाठ आता ग्रामीण भागात देखील कोरोना हातपाय पसरत असल्याचे दिसून येत आहे. पुण्याला लागुनच असणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातदेखील कोरोनाने थैमान घातले आहे.

अशाप्रकारची चिंताजनक परिस्थिती असताना शासकीय अधिकारी मात्र चक्क मद्य पार्टी करताना रंगेहात सापडले आहेत.काल गुरुवारी वैराग ग्रामपंचायत कार्यालयात चक्क मद्य पार्टी आयोजित करण्यात आली होती.

आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी दशमीला पादुका पंढरपूरात पोहचविण्याचा निर्णय – अजित पवार

ग्रामपंचायत प्रशासनातील वैरागचे ग्रामविकास अधिकारी अनिल बारसकर आणि त्यांचे इतर 3 सहकारी मद्य पार्टी करत होते. हा प्रकार लक्षात येताच ग्रामपंचायत सदस्य अरुण सावंत यांनी कार्यालय गाठलं. त्यावेळी कार्यालयात पार्टी करणाऱ्या चौघांना त्यांनी रंगेहाथ पकडलं. हा सगळा प्रकार उपस्थितांनी मोबाईल कॅमेरात टिपला. या पार्टीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.

या सर्व दारुड्या लोकांवर शासकीय आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तसेच जिल्ह्यात दारूबंधी असताना शासकीय आस्थापनेत मद्य प्राशन केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादंवि कलम 269, 270, 188 सहकलम राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 55 आणि महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 85 (1) प्रमाणे या चारही आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यल आला आहे.

भुजबळांचा दणका : नागपूर व गडचिरोलीचे जिल्हा पुरवठा अधिकारी निलंबित