टीम महाराष्ट्र देशा: आपण सोशल मीडियावर अनेक आश्चर्यचकित करणारे व्हायरल व्हिडिओ Viral Video बघत असतो. अनेक वेळा हे व्हिडिओ बघत असताना आपल्या अंगावर शहारे सुद्धा येतात. कारण आपल्याला या व्हिडिओमध्ये ॲनिमल्स स्टंट पासून अनेक ॲडवेंचर्स गोष्टी बघायला मिळतात. याचबरोबर या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये लोक आपल्याला आपल्या जीवाशी खेळताना देखील दिसतात. सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला असेच काही कृत्य दिसत आहे. तुम्ही आजपर्यंत स्पायडरमॅन, सुपरमॅन, बॅटमॅन अनेक मॅन बघितले असतील पण सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला ‘स्नेकमॅन’ बघायला मिळेल.
सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक माणूस चक्क किंग कोब्रा ला किस Kiss करताना दिसत आहे. हा व्हिडिओ बघून वापरकर्त्यांचे मन घाबरून गेले आहे. कारण जगातील सर्वात विषारी आणि धोकादायक सापाला किस करताना हा व्यक्ती दिसत आहे. हा व्हिडिओ बघून वापरकर्त्यांमध्ये एक खळबळ उडाली आहे.
स्नेकमॅन चा भीतीदायक व्हिडिओ
आपल्या डोळ्यांना भीतीदायक धक्का देणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये हा माणूस हळूहळू सापाच्या जवळ जाऊन त्याचे चुंबन घेताना दिसत आहे. व्हिडिओ मधील हा माणूस जगातील सर्वात विषारी आणि धोकादायक किंग कोब्रा या सापाचे चुंबन घेताना दिसला आहे. या व्हिडिओची सर्वात आश्चर्यचकित करणारी बाब म्हणजे ती व्यक्ती सापाची चुंबन घेताना सापाने त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिल्याचे दिसत नाही.
पाहा व्हिडिओ
Viral Video | किंग कोब्राला Kiss करणाऱ्या 'या' माणसांचा व्हिडिओ झाला व्हायरलhttps://t.co/NX4cI28fKJ
— Maharashtra Desha महाराष्ट्र देशा (@MHD_Press) October 22, 2022
व्हायरल व्हिडिओ Viral Video
इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ 10_viper_21 या इंस्टाग्राम हँडल द्वारे पोस्ट करण्यात आलेला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सर्प तज्ञ व्हावा सुरेश यांच्या नावाचा उल्लेख केलेला आहे. सुरेश एक केरळ राज्यातील लोकप्रिय सर्पमित्र असून त्यांनी आतापर्यंत 38 हजार साप पकडले आहेत. सुरेश ला केरळ मधील लोक ‘स्नेक मॅन ऑफ केरळ’ असेही म्हणून ओळखतात.
महत्वाच्या बातम्या
- Gopichand Padalkar | “जयंत पाटील यांच्या घरावर भाजपचा झेंडा लागेल”; भाजप नेत्याच्या विधानाने राष्ट्रवादीत खळबळ
- Skoda Kushaq | Skoda Kushaq लवकरच दिसणार नव्या अवतारात
- Narayan Rane । “फोटोवर दुसरा कागद टाका आणि…”; ठाकरे गटाच्या ‘त्या’ टीकेला राणेंचं प्रत्युत्तर
- Travel Guide | ‘ही’ आहेत भारतातील सर्वोत्तम Hills Station
- Kishori Pednekar | ‘मिलिंद नार्वेकरांनी दिल्या अमित शहांना शुभेच्छा’, किशोरी पेडणेकर म्हणाल्या…