भीमा कोरेगाव दंगलीतील नुकसानग्रस्तांना लवकरच भरपाई मिळणार – चंद्रकांत पाटील

मुंबई  : भीमा कोरेगाव येथील दंगलीमध्ये नुकसान झालेल्यांना मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यानुसार या दंगलीतील नुकसानग्रस्तांना संपूर्ण भरपाई देण्याचा निर्णय आज घेण्यात आला असल्याची माहिती मदत व पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिली.

नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त अन्य घटनांमधील आपत्तीग्रस्तांना मदत देण्यासाठी मदत व पुनर्वसनमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळ उपसमिती नेमण्यात आली आहे. या समितीच्या बैठकीत भीमा कोरेगाव दंगलीतील नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला.

bagdure

या दंगलीमध्ये सुमारे 7 कोटी 97 लाख रुपयांची हानी झाल्याचा अहवाल पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य शासनास पाठविला होता. त्यानुसार या नुकसानीची रक्कम लवकरच जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार असून त्यांच्यामार्फत नुकसानग्रस्तांच्या बँक खात्यात ती जमा करण्यात येणार असल्याचे श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

यावेळी मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिव मेधा गाडगीळ, वित्त विभागाचे यू.पी.एस. मदान आदी यावेळी उपस्थित होते.

You might also like
Comments
Loading...