वाहन चोरट्यांनी दोन दुचाकी लांबवल्या

औरंंगाबाद : वाहन चोरांनी चोवीस तासात दोन दुचाकी लांबविल्या. या दोन्ही घटना रविवारी घडल्या. सरजू कचरु खिस्ते (वय ५०, रा. गारखेडा परिसर) यांनी रविवारी दुपारी दोनच्या सुमारास रिलायन्स मॉलसमोर दुचाकी (एमएच-२०-डीक्यू-३९०६) उभी केली होती.

त्यानंतर ते भाजीपाला खरेदीसाठी गेले होते. दुपारी अडीचच्या सुमारास ते दुचाकी घेण्यासाठी आले. तोपर्यंत त्यांची दुचाकी चोराने लांबविली होती. तसेच सुमीत संजय अहिरे (वय २५, रा. छत्रपतीनगर, मुकुंदवाडी) याने रविवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास जयभवानीनगरातील ठाले यांच्या घरासमोर दुचाकी (एमएच-२०-ईडी-६४६०) उभी केली होती.

त्याची दुचाकी चोराने हँडल लॉक तोडून लांबविली. याप्रकरणी संबंधीत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.

महत्त्वाच्या बातम्या