जाधव दाम्पत्याला विठू माऊलीच्या शासकीय पूजेचा मान

टीम महाराष्ट्र देशा : पंढरपुरात पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास विठूरायाची शासकीय महापूजा पार पडली. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत यंदा पूजेचा मान हिंगोलीच्या जाधव दाम्पत्याला मिळाला. अनिल जाधव आणि वर्षा जाधव यांनी विठ्ठल आणि रुक्मिणीची महापूजा केली. जाधव दाम्पत्य हे शेणगाव तालुक्यातील भगवती गावचे रहिवासी आहेत.

शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव मिळावा अशी मागणी विठ्ठलाकडे केल्याचं यावेळी जाधव दाम्पत्यानं सांगितलं.महापूजेवेळी जलसंपदामंत्री गिरिश महाजन, परिवहनमंत्री दिवाकर रावते, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्यासह शिवसेनेचे खासदार अनिल देसाई उपस्थित होते.

शेतकऱ्यांवर होतं असलेल्या अन्यायाविरोधात एकत्र या – रघुनाथदादा पाटील

 

“सायकल” चित्रपटाची टीम पुणेकरांच्या भेटीला !

You might also like
Comments
Loading...