औरंगाबाद : केंद्र शासनाच्या नियोजनाप्रमाणे औरंगाबाद शहरात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला प्रारंभ झाला आहे. लस आल्यामुळे कोरोनाची धास्ती कमी झाली असली तरीही कोरोना झालेला असेल तर आपणास लस घेता येते का? असे प्रश्न अनेकांना पडले आहेत. कोरोना झालेला असल्यास संबंधित व्यक्तीस चार किंवा आठ आठवड्यांनी कोरोना लस घेता येते, असे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी स्पष्ट केले आहे.
पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवेतील शासकीय आणि खासगी रूग्णालयांतील वैद्यकीय अधिकारी व नर्ससह इतर कर्मचारी वर्गाचे लसीकरण केले जात आहे. सुरुवातीला औरंगाबाद शहरात लसीकरणास अल्प प्रतिसाद मिळत होता. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लस घेतल्यानंतर यात लाक्षणिक वाढ झाली. ज्यांना कोरोना होऊन गेला आहे, अशांना कोरोना झाल्यापासून चार किंवा आठ आठवड्यांनी कोरोनाची लस घेता येत असल्याचे डॉ. पाडळकर यांनी स्पष्ट केले.
उपाशीपोटी लस घेऊ नये : कोरोनाची लस घेण्यास येताना पोट खाली नसावे. थोडासा नाष्टा तरी किमान केलेला असावा. त्यामुळे रिअॅक्शन येण्याची शक्यता कमी असते. कोरोना लसीमुळे उलटी, मळमळ, काहीसा ताप येणे ही साधी लक्षणे आहेत. त्यात घाबरून जाण्यासारखे काहीच नाही. त्यामुळे प्रत्येकाने मनात भीती न ठेवता लस घ्यावी, असे आवाहन डॉ. पाडळकर यांनी केले.
महत्वाच्या बातम्या
- भाजपाच्या अधिकृत वेबसाइटवर रक्षा खडसे यांचे अपमानजनक वर्णन पाहून मला धक्का बसला : देशमुख
- वादग्रस्त स्क्रीनशॉर्ट व्हायरल झाल्यानंतर रक्षा खड्सेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…
- मोहम्मद शमीने वडिलांच्या आठवणीत इन्स्टाग्रामवर शेअर केली भावुक पोस्ट, म्हणाला.
- विराट-रोहितचा दबदबा कायम; विराट नंबर वन वर तर रोहित.
- सौरव गांगुलीच्या प्रकृतीबाबत हॉस्पिटलने दिले मोठे अपडेट्स