धक्कादायक : येवले चहामध्ये गडद रंग येण्यासाठी होतोय टारट्राझाईनचा वापर

पुणे : पुण्यातून ‘येवले अमृततुल्य चहा’च्या शाखांना सुरुवात झाली. अल्पावधीतच पुणेकर चहाप्रेमींच्या मनात ‘येवले अमृततुल्य चहा’ने स्थान मिळवलं. पुणेकरांनी गौरवलेला चहा राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचला. मात्र आता ‘येवले अमृततुल्य चहा’ला अन्न आणि औषध प्रशासनाने दणका दिला आहे. येवले चहामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध झालं आहे. केंद्र सरकारच्या प्रयोगशाळेच्या अहवालात या चहामध्ये भेसळ असल्याचे समोर आलं आहे.

माध्यमात आलेल्या वृत्तानुसार,येवले अमृततुल्य चहामध्ये रंग टाकत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, एफडीएने येवले चहाच्या पुण्यातील कोंढव्यामध्ये असणाऱ्या कंपनीवर छापा टाकला आणि हे उत्पादन केंद्र बंद ठेवण्याचे आदेश दिले. पण, आता पुन्हा येवले चहा चर्चेत आला आहे.

Loading...

एफडीएने दिलेल्या अहवालानुसार, पुण्याच्या येवले अमृततुल्य चहामध्ये रंग मिसळत असल्याचं स्पष्ट झालं आहे. मुंबई, पुणे आणि अशा बऱ्याच ठिकाणी येवले अमृततुल्य चहाचे बरेच ऑउटलेट्स आहेत. त्यामुळे हा चहा मुंबईतही प्रसिद्ध आहे. चहाला घट्टपणा आणि गडद रंग यावा यासाठी टारट्राझाईन हा घटक वापरला जात असल्याचं एफडीएकडून मंगळवारी स्पष्ट करण्यात आलं आहे. हे एफएसएसएआयच्या नियमांचं उल्लघंन करण्यासारखं आहे.

यापूर्वीही अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाई करत ‘येवले अमृततुल्य चहा’चे राज्यभरातील उत्पादन आणि विक्री बंद ठेवण्याचे आदेश एफडीएने दिले होते. त्यामुळे चहाप्रेमी काहीसे नाराज झाले होते. पण चहामध्ये पुन्हा भेसळ आढळल्यामुळे आता यावर कारवाई करण्यात येणार आहे.

कुठलाही भेसळीचा प्रकार येवले चहा मध्ये केला जात नाही तसेच FDA कडून आम्हाला एकही नोटीस किंवा सूचना याबाबत आलेली नाही, असं स्पष्टीकरण येवले चहाचे संचालक नवनाथ येवले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे.

कलर भेसळीच्या बातम्यांबद्दल येवले म्हणतात, मला सोशल मीडिया आणि काही मित्रांच्या कॉलवरून समजल की येवले अमृततुल्य मध्ये भेसळ आढळली अश्या बातम्या येत आहेत. मी सर्व ग्राहकाना विश्वास देतो असा कुठलाही भेसळीचा प्रकार येवले चहा मध्ये केला जात नाही.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'