सवर्ण आरक्षण विधेयक हा सिक्सर नाही,खरे सिक्सर तर पुढे पाहायला मिळतील : प्रसाद

दिल्ली : लोकसभा निवडणुकीला चार महिने राहिले असताना सवर्णांना आरक्षण देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने मोठी खेळी खेळली आहे. या निर्णयामुळे भाजप विरोधातली धार थोडी कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मोदींनी केलेल्या या चाणाक्ष खेळीमुळे विरोधी पक्ष चांगलाच गोंधळून गेला आहे. याच मुद्द्यावरून राज्यसभेत वादळी चर्चा झाली. केंद्रीय कायदेमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी विरोधकांना आपल्या भाषणादरम्यान चिमटा काढला.

सवर्णांना आरक्षण देण्यासाठी राज्यसभेत बुधवारी घटनादुरुस्ती विधेयक मांडण्यात आले. यानिमित्ताने प्रसाद यांनी प्रत्युत्तर दिले. क्रिकेटमध्ये शेवटच्या निर्णायक षटकांमध्ये षटकार मारले जातात. विरोधकांना याचा त्रास होत असेल तर त्यांना अजून षटकार बघायचेत. सवर्ण आरक्षण विधेयक हा सिक्सर नाही. खरे सिक्सर तर पुढे पाहायला मिळतील, असे वक्तव्य रवीशंकर प्रसाद यांनी केले.

You might also like
Comments
Loading...