येणारा अर्थसंकल्प हा लोकप्रिय नसणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी

भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणांची प्रक्रिया कायम राहील

नवी दिल्ली: फेब्रुवारी महिन्यात सादर होणाऱ्या बजेटमध्ये नेमक काय असेल याची देशभरातील सर्व नागरिकांना उत्सुकता आहे. मात्र याच उत्सुकतेवर पाणी फेरण्याचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. केंद्र सरकारकडून आगामी काळात मांडण्यात येणारं अर्थसंकल्प सर्वांना खूश करणारा नसेल. मात्र सरकारचा आर्थिक सुधारणांना दिशा देण्यावर भर असणार आहे. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणांची प्रक्रिया कायम राहील. असे नरेंद्र मोदी यांनी २१ जानेवारीला स्पष्ट केले.

bagdure

यावर्षी मांडण्यात येणारा अर्थसंकल्प हा लोकप्रिय नसल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले असून सरकार आपल्या सुधारणांच्या अजेंड्यावर चालणार आहे, म्हणूनच भारतीय अर्थव्यवस्था कमकुवत अर्थव्यवस्थांच्या पाच प्रमुख गटांतून बाहेर येऊन जगातील एक वेगळी व आकर्षक अर्थव्यवस्था म्हणून उदयास आली आहे. असे नरेंद्र मोदी यांनी ‘टाईम्स नाऊ’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले. यावेळी लोकांना खूश करणारा अर्थ संकल्प असेल का? असे विचारले असता पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, लोकांना मोफत गोष्टी आणि सूट हवी असते, ही एक धारणा झाली आहे.

नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, सर्वसामान्य जनतेला प्रामाणिक सरकार हवे आहे. सर्वसामान्य जनतेला सूट किंवा मोफत वस्तू नकोत. ही तुमची कोरी कल्पना आहे. आमच्या सरकारचे निर्णय जनतेच्या गरजा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आहेत. मुलाखतीदरम्यान पंतप्रधान मोदींनी आपल्या सरकारच्या आर्थिक धोरणांचा जोरदार बचाव केला. तसेच आपल्या अर्थविषयक धोरणांचे समर्थन करत मोदींनी नोटाबंदी हे एक मोठे यश आहे, असे सांगितले. त्याचप्रमाणे देशात ‘एक देश एक कर’प्रणाली लागू करण्यासाठी ‘जीएसटी’मध्ये नवे बदल करण्यात आल्याचे ते म्हणाले. अर्थव्यवस्थेची वाढ होतेय पण देशात बेरोजगारी वाढतेय हा विरोधकांचा आरोप खोटा असल्याचे मोदींनी सांगितले. सरकार नव्या रोजगारांची निर्मिती करत आहे, असे ते म्हणाले.

You might also like
Comments
Loading...