‘या’ दिग्गज नेत्यांच्या महाविद्यालयाचे प्रस्ताव विद्यापिठाने फेटाळले

DR bamu main building

औरंगाबाद : नवीन महाविद्यलयासाठी विद्यापीठाच्या कार्यकक्षेत ११८ पारंपरिक महाविद्यालयांचे बिंदू राज्य सरकारने निश्चित केले होते. याच व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांचे ५१ बिंदू होते. बृहत् आराखड्यासाठी महाविद्यालयांनी ३१ डिसेंबरपर्यंत प्रस्ताव दाखल केले होते. महत्वाची बाब म्हणजे पारंपरिक महाविद्यालयांच्या ११८ बिंदूंसाठी शंभर ठिकाणी प्रस्ताव आले. यात नव्या महाविद्यालयांचे प्रस्ताव दाखल करणारे सर्व प्रस्ताव प्रामुख्याने मराठवाड्यातील बड्या नेत्यांचे आहेत. आणि व्यवस्थापन परिषदेने सोमवारी बैठक घेतली व या बैठकीत या बड्या नेंत्याचे सर्व प्रस्ताव फेटाळले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बृहत आराखड्याप्रमाणे प्राप्त झालेल्या २५७ महाविद्यालयांपैकी फक्त १५ महाविद्यालयांचे प्रस्ताव विद्यापीठाने स्वीकारले आहेत. तर २३८ महाविद्यालयांचे प्रस्ताव फेटाळले आहेत. फेटाळलेल्या प्रस्तावात मराठवाड्यातील संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार या दोन मंत्र्यांसह काही विद्यमान आमदार व माजी आमदारांच्या संस्थानाही विद्यापीठाने नकार दिला आहे. प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ यांच्या अध्यक्षतेत मंगळवारी व्यवस्थापन परिषदेची बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

फक्त तीन निकष लावले 

फडणवीस सरकारमधील डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या २६ सप्टेंबर २०१५ रोजी राज्य सरकारला दिलेल्या अहवालात नवीन महाविद्यालय सुरू करण्यासाठी १३ निकष लावण्यात आले होते. व्यवस्थापन परिषद सदस्यांनी मात्र फक्त तीन निकष गृहित धरले. दहा हजार लोकसंख्या असावी, पंधरा किलोमीटरपर्यंत दुसरे कॉलेज असू नये आणि या पूर्वीच्या कॉलेजला नॅक झालेले असावे. या तीन निकषांच्या आधारावर ९३ टक्के प्रस्ताव फेटाळण्यात आले. यात आमदार उदयसिंह राजपूत यांचे १५, नारायण कुचेंचे ३, मंत्री संदिपान भुमरे ४, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे १२, माजी मंत्री अर्जुन खोतकर, शिवाजी चोथे, आ. हरिभाऊ बागडे, डॉ. कल्याण काळे, विलासराव खरात, कपिल आकात (प्रत्येकी ३), प्रस्ताव फेटाळण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या