मुंबई: काल (२८ डिसेंबर) विधान परिषदेच्या हिवाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस होता. मात्र अखेरचा दिवस विरोधकांच्या गोंधळानेच सर्वाधिक गाजला. काल राज्यपालांचे अधिकार कमी करणारे विद्यापीठ सुधारणा विधेयक (University Law Amendment Bill) गोंधळात मंजूर करण्यात आले. मात्र या विधेयकाला भाजपने विरोध केला असून जानेवारी महिन्यात ठाकरे सरकारविरोधात आंदोलन करण्याचा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिला आहे. तर भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनीही विधेयक चर्चेविना मंजूर करण्यात आल्याने टीका केली आहे.
विद्यापीठांना सरकारी महामंडळ करण्याचं काम सुरू आहे.विद्यापीठांवर सरकारचा ताबा आणला जात असून सगळे अधिकार थेट मंत्री घेत आहेत. यामुळे विद्यापीठाचा सत्यानाश होईल. तुमच्या PA कडे रांगा लागतील. मर्जीनुसार कोर्सेस तयार केले जातील. असा घणाघात चित्रा वाघ यांनी ट्वीट करत केला आहे.
विद्यापीठांना सरकारी महामंडळ करण्याचं काम सुरूहे
विद्यापीठांवर सरकारचा ताबा आणला जातोय सगळे अधिकार थेट मंत्री घेताहेत
यानं विद्यापीठाचा सत्यानाश होईल.. तुमच्या PA कडे रांगा लागतील
मर्जीनुसार कोर्सेस तयार केले जातील @Dev_Fadnavis#महाराष्ट्र_सार्वजनिक_विद्यापीठ_सुधारणा_विधेयक— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) December 28, 2021
दरम्यान राज्य सरकारच्या या विधेयकामुळे आता राज्यपालांचे अधिकार कमी होणार असून राज्यातील विद्यापीठांवर अंकुश ठेवण्यासाठी प्र-कुलपतीपद निर्माण करण्यात येणार आहे. या प्र-कुलपतीपदी राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री असणार आहेत. त्यामुळे विद्यापीठांच्या कुलगुरुंची नियुक्ती आता थेट राज्यपाल करू शकणार नाहीत. मात्र या विधेयकाला भाजपकडून विरोध केला जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘भ्रष्टाचाराच्या दृष्टीने विद्यापीठ कायदा दुरुस्ती विधेयक मंजूर केले’, भाजपचा आरोप
- उपसभापती गोऱ्हे यांच्याविरोधात दरेकरांनी मांडला अविश्वास ठराव
- 2 जानेवारीला होणारी एमपीएससीची परिक्षा पुन्हा पुढे ढकलली; पुढील तारीख लवकरच होणार जाहीर
- तुम्हाला ते जमलं नाही निदान नाच्याचं काम तरी नीट करा; भास्कर जाधवांचा राणेंवर पलटवार
- नारायण राणेंकडून भास्कर जाधवांना ‘नाचा’ची उपमा