fbpx

‘बामू’ विद्यापीठाला नॅकचा ‘ए’ किंवा ‘बी’ दर्जाच मिळणार

Marathwada-University

औरंगाबाद/अभय निकाळजे(वरिष्ठ वार्ताहर) : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कितीही राजकारण असले तरी ‘नॅक’ ‘ए’ किंवा ‘बी’ ग्रेड मिळणारच आहे,यात शंकाच नाही. शंका आहे, ती राजकारण्यांच्या तालावर नाचणाऱ्या माध्यमांच्या प्रतिनिधींना.

गेल्या काही दिवसांपासून विद्यापीठ चर्चेत आहे. ते वेगवेगळ्या कारणांनी पण त्याचा आणि ॲकॅडमिक (शैक्षणिक) विभागाचा अर्थाअर्थी संबंध नाही. कारण या विद्यापीठात जे लोक (विद्यार्थी नेते म्हणवणारे प्राध्यापक) राजकारण करतात. त्यांचा ॲकॅडमिक लोकांशी तसा संपर्क कमी येतो. त्यामुळे त्यांनी केलेल्या राजकारणाचे पडसाद ॲकॅडमिक क्षेत्रावर होत नाहीत. त्यामुळे शैक्षणिक राजकारणी पुढाऱ्यांनी विद्यापीठाचा ॲकॅडमिक नॅक दर्जा जाणार म्हणून चर्चा सुरू केली आहे. पण ज्यांनी ही चर्चा सुरू केली, त्यांना कदाचित नॅकचा दर्जा विद्यापीठाला कसा मिळतो हे माहित नसावे. कारण विद्यापीठात नियमीत ॲकॅडमिक ॲक्टिव्हीटी जोरात सुरू आहेत. त्यामुळे त्या ॲक्टिव्हीटीचे गुण कुणी कितीही काहीही करण्याचा प्रयत्न केला तरी विद्यापीठाला मिळणारच आहेत. त्या ॲक्टिव्हीटींचा विचार केला तर विद्यापीठाला ‘ए’ किंवा ‘बी’ ग्रेड निश्चितच मिळेल यात शंकाच नाही. त्यामुळे कोणत्या गोष्टींचा कश्यावर परिणाम होतो, याचा अंदाज न आल्याने अश्या प्रकारच्या वावड्या उठवल्या जातात. पण त्याचा नॅक वर काहीही परिणाम होत नाही.