video-‘मैदान’ भाड्याने देऊन विद्यापीठाने केली मनमानी

पुणे : सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठाने हिंदी चित्रपटाच्या शुटींग साठी ६ लाख रुपये भाडेतत्वावर नागराज मंजुळे यांना मैदान भाड्याने दिले. हा निर्णय विद्यापीठाने मनमानी करत घेतल्याचं स्पष्ट झाल आहे. तसेच विद्यार्थांचा कोणताही विचार न करता मंजुळेना मैदान दिल्यामुळे यामध्ये विद्यार्थांचे नुकसान तर विद्यापीठाचे हित दिसून येत आहे. त्यामुळे फक्त पैशांसाठी विद्यापीठाने मंजुळे यांना मैदान भाड्याने दिले का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

विद्यापीठाने स्वहित जोपासत मैदान हिंदी चित्रपटाच्या शुटींग साठी भाड्याने दिल्यामुळे याबाबत राज्याच्या उच्च शिक्षण संचालनायाने चौकशी सुरु केली असून विद्यापीठाकडून अहवाल मागविला आहे. विद्यापीठाने राज्य सरकार, उच्च शिक्षण संचालन यांची कोणतेही परवानगी न घेता. विद्यार्थांचे खेळण्याचे मैदान परस्पर निर्णय घेऊन भाड्याने दिले आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासन टीकेस पात्र आहे. नागराज मंजुळे यांच्याकडून ६ लाख रुपयाच्या बदल्यात ४५ दिवसांसाठी मैदान भाड्याने दिले होते. मात्र आता १२० दिवस झाले तरी मैदान जैसे-थे स्थितीत असून मैदानावर चित्रपटाचा सेट हि तसाच आहे. यामुळे ऐन हिवाळ्यात विद्यार्थांचा शारीरिक विकास खोळंबला असून विद्यापीठ प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे. सदर प्रकरणावर विद्यापीठाने अजूनही कोणतीच ठोस भूमिका घेतली नाही. ‘मैदानाबाबतचा मुद्दा योग्य असून विद्यार्थांना मैदान खेळण्यासाठी कशे उपलब्ध होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे’ उत्तर विद्यापीठ प्रशासन देत आहे. यावरून १२० दिवस उलटले तरी विद्यापीठ प्रशासन गंभीर नसल्याचे स्पष्ट होत आहे.