विद्यापीठाकडून विद्यार्थांवर जाणीवपूर्वक गंभीर गुन्हे दाखल

पुणे: सावित्रीबाई फुले विद्यापीठात आरोग्य केंद्रातील भोंगळ कारभाराविरोधात आवाज उठवला म्हणून विद्यार्थांवर गंभीर प्रकारचे खोटे गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे विद्यापीठ विद्यार्थांना घडवण्यासाठी आहे कि त्यांचे भविष्य उद्वस्थ करण्यासाठी? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आरोग्य केंद्रातील दुरावस्थेविरोधात आंदोलन केले म्हणून अभाविपच्या ४ विद्यार्थांवर विद्यापीठाकडून गुन्हे दाखल करण्यात आले. गुन्हे मागे घ्यावेत आणि आरोग्य केंद्रातील परिस्थिती सुधारावी या मागण्यांसाठी अभविप कडून मंगळवार पासून उपोषण सुरु करण्यात आले आहे.

आरोग्य केंद्रातील परिस्थिती सुधारावी म्हणून अभाविप गेल्या ६ महिन्यांपासून आंदोलन करत आहे. आरोग्य केंद्रातील अपुऱ्या सुविधेमुळे आतापर्यंत ४ विद्यार्थांन प्राणाला सुद्धा मुकावे लागले. तरीदेखील विद्यापीठ प्रशासन बघ्याची भूमिका घेत गप्प बसून आहे. विद्यार्थांनी आरोग्य केंद्रातील परिस्थिती संदर्भात आंदोलन केले असता. आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. शशिकांत दुधगावकर यांनी जाणून बुजून विद्यार्थांवर गुन्हे दाखल केले. याविरोधात अभाविपचे श्रीराम कंधारे,विनायक राजगुरू,हनमंत रंगा,ऐश्वर्या भणग,सचिन लांबुरे,प्रियंका रणदिवे, शिशीकांत टिंगरे हे ७ विद्यार्थी उपोषणाला बसले आहेत.

विद्यापीठाचे  कुलगुरू नितीन करमळकर यांनी विद्यार्थांना चर्चा करण्यास बोलावले असता. विद्यार्थांनी ठाम भूमिका घेत आधी गुन्हे मागे घ्या नंतर चर्चा असा पवित्रा विद्यार्थांनी घेतला आहे.

Loading...

पहा काय म्हणत आहेत विद्यार्थी 

4 Comments

Click here to post a comment