‘या’ नगरपालिकेचा अनोखा उपक्रम … प्लास्टिकच्या बदल्यात मिळणार जेवण

टीम महाराष्ट्र देशा : छत्तीसगडच्या अंबिकापुर शहरात गार्बेज कॅफे हा अभिनव उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या अनोख्या कॅफेमध्ये, गरीब लोक आणि कचरा वेचक यांना एक किलोग्राम प्लास्टिक आणून देण्याच्या बदल्यात मोफत अन्न मिळेल. अर्धा किलोग्राम प्लास्टिकच्या मोबदल्यात नाश्ता दिला जाईल. छत्तीसगढचे आरोग्य मंत्री टी. एस. सिंग देव यांनी काल या कॅफेचं उद्घाटन केलं.

या कॅफेला शहराच्या सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट सेंटरमध्ये चालवण्यात येणार आहे.  नगरपालिकेने हा प्रस्ताव पारित केला असून लवकरच यावर अंबलबजावणी केली जाईल. प्लास्टिकमुळे पर्यावरणाला होणारं नुकसान रोखण्यासाठी अंबिकापूर नगरपालिकेने  हा उपक्रम सूरु केला आहे. या कॅफेत प्लास्टिक कचऱ्याच्या बदल्यात नागरिकांना मोफत जेवण उपलब्ध करुन देणार आहे. प्लास्टिकच्या पिशव्या जमा केल्याने एकीकडे शहर आणखी स्वच्छ होईलच पण ते जमा करून देणाऱ्या कचरा वेचकांना पोटभर अन्न देखील मिळणार आहे. यामुळे कचरा वेचकांना  फुकटात नाही तर प्लास्टिक पिशव्या जमा करण्याच्या मोबदल्यात मिळालेल्या जेवणाचा आनंद घेता येणार आहे.

एक  किलो प्लास्टिकच्या बदल्यात एकवेळचं भरपेट जेवण  तर ५०० ग्रॅम प्लास्टिक आणल्यास ब्रेकफास्ट मोफत मिळणार आहे. या कॅफेमधून जमा होणारं प्लास्टिक रस्ते बनवण्यासाठी वापरण्यात येणार आहे. याआधी देखील शहरात प्लास्टिकचे तुकडे  आणि डांबरपासून रस्ते बनवण्यात आले होते. बजेटमध्ये या गार्जेब कॅफेसाठी ५ लाख रुपये देण्यात आले आहेत. या अंतर्गत नगर निगम गरीब आणि बेघर लोकांना मोफत जेवण देण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या :