डार्विनच्या सिद्धांतानंतर केंद्रीय मंत्र्याचं न्यूटनच्या गतीविषयक नियमांना आव्हान

satyapal sinh

नवी दिल्ली: शिक्षण राज्यमंत्री सत्यपाल सिंह  यांनी डार्विनच्या उत्क्रांतीवादाच्या सिद्धांताला आव्हान देत मानवाची उत्पत्ती ही माकडांपासून झाली नसल्याचा दावा करीत त्यासाठी वेदांचा संदर्भ दिला होता. त्यानंतर आता त्यांनी पुन्हा एकदा न्यूटनच्या गतीविषयक नियमांना आव्हान दिले आहे.

माजी आयपीएस अधिकारी असलेले सत्यपाल सिंह केंद्रीय शैक्षणिक सल्लागार समितीच्या बैठकी दरम्यान हे विधान केलं आहे. न्यूटन यांचे गतिचे नियम यापूर्वीच आपल्या पुराणातील मंत्रांमध्ये सांगितले गेले आहेत. त्यामुळे अशा माहिती अभ्यासक्रमांमध्ये समाविष्ट झाली पाहिजे असं सत्यपाल यांनी म्हटलं आहे. तसंच, शाळा आणि महाविद्यालयांचं बांधकाम वास्तूशास्त्रानुसार करण्यात यायला हवं, असंही सिंह म्हणाले.