लढाऊ विमान कोसळून दोन पायलटांचा दुर्दैवी मृत्यू

टीम महारष्ट्र देशा : बंगळूर येथे एचएएलच्या विमानतळावर एक धक्कादायक घटना घडली आहे. शुक्रवारी सकाळी लढाऊ विमान कोसळून दोन पायलटांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मिराज 2000 अस हे लढाऊ विमान होत. तसेच दोन्ही पायलट प्रशिक्षणार्थी होते.

विमानाला आगलागताच दोन्ही पायलटनी पॅरॅशूटच्या साह्याने उडी मारली होती. मात्र, एक पायलट विमानाच्या अवशेषांवर पडल्याने जागीच मरण पावला, तर दुसऱ्या पायलटचा उपचारावेळी मृत्यू झाला. हे दोन्ही पायलट लढाऊ विमानाचे प्रशिक्षण घेत होते पण काळ वाईट आल्याने या दोन्ही पायलटना आपला जीव गमवावा लागला.

मिराज 2000 हे लढाऊ विमान हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने ने बनविलेले आहे . तसेच हे विमान हवाई आणि नौदलाच्या पायलटना प्रशिक्षण देण्यासाठी वापरले जाते. हवाई दलाने या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले असून हे विमान एचएएलद्वारे अद्ययावत केले गेले होते. तरीही या विमानाचा अपघात झाल्याने चौकशी करणार असल्याचे हवाई दलाने स्पष्ट केले.