‘काका-पुतण्याच्या’ टोळीने ‘मुळशी पॅटर्नद्वारे’ कब्जा मारलेली ११३ एकर जमिन मोकळी केली, आता लवकरच..’

gopichand padalkar

जेजुरी: सर्वाच्च न्यायालयाने देवस्थानांबद्दल एक मोठा निर्णय दिला आहे.  मराठेकालीन आणि पेशवेकालीन राजे महाराज यांनी देवाच्या नावाने ज्या जमिनी मानकरी किंवा सेवेकरी यांना दिल्या होत्या, त्या जमिनी आता देवसंस्थानाच्या मालकीच्या असून वहिवाटदारांना त्यावर एकही हक्क सांगता येणार नाही. असा निकाल सर्वाच्च न्यायालयाने दिला आहे. यादरम्यान जेजुरी देवस्थानची ११३ एकर जमीन पश्चिम महाराष्ट्रात असून याचा सर्वाधिक लाभ मार्तंड देवस्थानला झाला आहे. मात्र यावरूनच भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीवर निशाना साधला आहे.

‘आम्ही सर्वोच्च  न्यायालयाचे आभारी आहोत,कारण श्री मल्हारी मार्तंड खंडोबाच्या भक्तांना पंरपरागत मिळालेल्या देवस्थानच्या जमिनी ‘काका-पुतण्याच्या’ टोळीने ‘मुळशी पॅटर्नद्वारे’ कब्जा मारलेली ११३ एकर जमिन मोकळी केली. आता लवकरच यांचे पितळ जगापुढे उघडे पडणार आहे. ।।यळकोट यळकोट जय मल्हार।। असे ट्वीट पडळकर यांनी केले आहे.

या निकालावरून पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाना साधत टोला लगावला आहे. यावरून त्यांनी राष्ट्रवादीवर निशाना साधला आहे. दरम्यान यापूर्वी गोपिचंद पडळकर यांच्यावर जेजुरी येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. शासकीय कामात अडथळा आणि जमावबंदीचे उल्लंघन करीत त्यांनी पोलिसांशी वाद केला होता, येवून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

महत्त्वाच्या बातम्या