जाणून घ्या राज्यभरात आचारसंहितेदरम्यान कुठे मिळालं किती घबाड

blank

टीम महाराष्ट्र देशा- विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत प्राप्तीकर विभागाच्या तपास पथकानं मुंबईतून २९ कोटी रुपयांची बेहिशेबी रक्कम जप्त केली आहे. मुंबईतल्या ३६ संवदेनशील मतदार संघांत शीघ्र कृती दलाच्या तुकड्या प्राप्तीकर विभागानं तैनात केल्या आहेत.

दरम्यान, अमरावती जिल्हयात विविध ठिकाणी भरारी पथकानं काल रात्री २० हजारांच्या मुद्देमालासह, १४ लाख रूपये जप्त केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.नांदेड-हिंगोली मार्गावर हिवरा पाटी इथं आचारसंहिता तपसाणी पथकानं दोन लाख ३३ हजार १५९ रुपये किमतीचा मद्याचा साठा काल जप्त केला. मद्याची ही १०० खोकी, नांदेडहून माहूर इथं नेली जात असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

गडचिरोली जिल्ह्यात नक्षलप्रभावित भागात ड्रोन आणि हेलिकॉप्टर वापरली जाणार आहेत. गडचिरोलीमध्ये सकाळी 7 वाजता मतदान सुरु झालं असून दुपारी 3 वाजता मतदान संपणार आहे. राज्य राखीव दलाच्या 110 तुकड्या आणि गृह रक्षक दलाचे 45 हजार 5 जवान इथं तैनात करण्यात आले आहेत.

नाशिक जिल्ह्यात मालेगाव आणि निफाड इथ ड्रोनच्या माध्यमातून दाट वस्तीच्या मतदान केंद्रांवर नजर ठेवण्यात येणार आहे.सातारा जिल्ह्यात काल झालेल्या पावसामुळे जावळी, वाईसह दुर्गम भागातल्या मतदान केंद्रात मतदान यंत्रे आणि इतर साहित्य नेताना कर्मचाऱ्यांना अडचणींनां तोंड द्यावं लागलं.

महत्वाच्या बातम्या