डब्ल्युटीसी फायनलसाठी पंचाची निवड झाली, सामनाधिकारी म्हणून ख्रिस ब्रॉड यांची निवड

मुंबई : संपुर्ण क्रिकेट जगताना उत्सुकता लागली आहे ती जागतीक कसोटी चॅम्पीयनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्याची. हा सामना १० दिवसावर ठेपुन आला आहे. भारत आणि न्युझीलंड दोन्ही संघ इंग्लंडमध्ये पोहोचले आहे. आयसीसीने यादरम्यान या सामन्यासाठी पंच आणि सामनाधिकारी यांची निवड जाहीर केली आहे.

क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच कसोटी विश्वविजेतेपदाची स्पर्धा आयोजीत करण्यात आली आहे. या स्पर्धेला १० दिवसांचा अवधी शिल्लक असताना आयसीसीने या सामन्यासाठी पंचाची घोषणा केली आहे. साउथहॅम्पटन येथे आयोजीत यासामन्यासाठी मैदानातील पंच म्हणून रिचर्ड इलिंगवर्थ व मायकेल गॉफ यांची निवड करण्यात आली आहे. तर तिसरे पंच म्हणून रिचर्ड केटलब्रो यांची तर चौथे पंच म्हणून ऍलेक्स वार्फ यांची निवड करण्यात आली आहे. या सामन्यासाठी सामनाधिकारी म्हणून ख्रिस ब्रॉड हे काम बघतील.

विशेष म्हणजे या सामन्यात निवड केलेल पंच हे इंग्लंडचे आहेत. कोरोना संसर्गामुळे एकाच देशाच्या पंचाची निवड केली असल्याचे आयसीसीचे वरिष्ठ संचालक ऍड्रियन ग्रिफिथ यांनी सांगितले. यावेळी ते म्हणाले, ‘या सामन्यासाठी आम्हाला अनुभवी पंचाची निवड करायची होती. मात्र कोरोना परिस्थीतीमुळे ते शक्य नसल्याने आम्ही इंग्लंडमधील पंचाची निवड केली.’ या सामन्यासाठी पंच म्हणून पाकिस्तानचे अलीम दार, श्रीलंकेचे कुमार धर्मसेना यांची नावे चर्चेत होती.

महत्वाच्या बातम्या

IMP